ऑनलाइन पद्धतीने झालेल्या वेफच्या जॉब्ज रिसेट समिट या परिषदेत हा अहवाल सादर करण्यात आला. भारतामध्ये जवळजवळ ५७ टक्के नोकरदार नोकरीच्या बाबतीत चिंतेत आहेत. मात्र त्याचवेळी यापैकी २५ टक्के नोकरदारांची ही चिंता तीव्र आहे तर सुमारे ३१ टक्के काहीसे चिंतीत आहेत. जगातील २७ देशांतील १२ हजारांहून अधिक नोकरदारांचे सर्वेक्षण यासाठी करण्यात आले. यामध्ये जागतिक स्तरावर ५४ टक्के नोकरदारांनी येत्या १२ महिन्यांत आपल्या नोकरीवर गदा येऊ शकेल असी भीती व्यक्त केली.
विविध देशांमधील नोकरदारांमध्ये नोकरीविषयीची सर्वाधिक चिंता रशियातील ७५ टक्के नोकरदारांनी व्यक्त केली. त्याखालोखाल स्पेन (७३ टक्के), मलेशिया (७१ टक्के), अमेरिका व नेदरलॅण्ड्स (३६ टक्के), स्वीडन (३० टक्के) या देशांतील नोकरदारांनी चिंता व्यक्त केली. नोकीर राहील की जाईल याविषयी सर्वात कमी २६ टक्के चिंता जर्मनीतील नोकरदारांनी व्यक्त केली आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times