या प्रकरणी २५ वर्षीय तरुणीने तक्रार दिली. त्यानुसार ३० वर्षे वयाच्या तरुणावर विनयभंग व मारामारीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुणी ही आठ ऑक्टोबरला हांडेवाडी रस्त्याने दुचाकीवरून जात होती. त्या वेळी पाठीमागून स्कोडा मोटारीतील अनोळखी व्यक्तीने त्यांना थांबविले. तुला हॉर्न वाजविलेला कळत नाही का , असे बोलून शिवीगाळ केली. त्या वेळी तरुणीने काय झाले अशी विचारणा केल्यानंतर, आरोपीने तरुणीने डोके दुचाकीच्या हँडलवर आदळले; तसेच तिला मारून विनयभंग केला. या प्रकारानंतर आरोपी निघून गेला. या घटनेनंतर तक्रारदार तरुणी घाबरली होती. तरुणीने तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला असून, वानवडी पोलिस अधिक तपास करीत आहेत.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times