मुंबईः यांनी पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर यांना दोषी ठरवले आहे. त्याचबरोबर त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सामाजिक कार्यकर्त्या यांचांही उल्लेख केला आहे. यावरूनच दमानिया यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

एकनाथ खडसेंनी राजीनामा दिल्यानंतर एका पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट आरोप केले होते. मला देवेंद्र फडणवीसांनी छळले आहे. माझ्यावर विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल झाला आणि तो देवेंद्र फडणवीसांनी करायला लावला. या सर्व मानसिक छळामुळेच मी पक्षांतराचा निर्णय घेतला, असं खडसेंनी म्हटलं होतं. त्याचबरोबर, अंजली दमानिया यांचाही त्यांनी पत्रकार परिषदेत उल्लेख केला होता. अंजली दमानिया यांनी माझ्यावर खोटे आरोप केले. पोलीस गुन्हा दाखल करून घेत नव्हते. पण देवेंद्र फडणवीस यांनी फोन करून पोलिसांना गुन्हा दाखल करण्याच्या सूचना केल्या, असा खळबळजनक खुलासा त्यांनी केला होता. यासगळ्यावर अंजली दमानिया यांनी प्रथमच प्रतिक्रिया दिली आहे.

‘एकनाथ खडसे कालच्या पत्रकार परिषदेत माझ्या बद्दल काही वक्तव्य केलं. यावर मी न बोलण्याचा निर्णय घेतला कारण तेव्हा मी घरी नव्हते आणि ते काय म्हणाले हे मी प्रत्यक्ष ऐकले नव्हते. पण रात्री मी जेव्हा ऐकलं तेव्हा तळपायाची आग मस्तकात गेली. आजही त्यांनी एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अतिशय घृणास्पद वक्तव्य केलं,’ असं अंजली दमानिया यांनी म्हटलं आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here