पुणेः बाजारात मागणी वाढल्यानं कांद्याच्या दराने पुन्हा उसळी मारली आहे. मुंबई आणि पुण्यात कांद्याचा भाव प्रति किलो १०० इतका झाला आहे. पुरवठ्यात कमतरता होत असल्यानं कांद्याचे भाव वाढली आहेत.

पुण्यासह महाराष्ट्राच्या विविध भागातील कांद्याला परराज्यातून वाढलेली मागणी आणि त्या तुलनेत स्थानिक भागातून पुरवठा कमी होत असल्याने कांद्याचे घाऊक बाजारासह किरकोळ बाजारात दर वाढले आहेत. घाऊक बाजारात कांदा १० किलोंसाठी ७०० रुपयांपर्यंत पोहोचला आहे. तर, किरकोळ बाजारात कांदा आता ९० ते १०० रुपये किलोपर्यंत पोहोचल्याने ऐन सणासुदीच्या काळात कांदा ग्राहकांच्या डोळ्यात पाणी आणणार आहे.

राज्यभर नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीचा मोठा फटका कांद्याच्या पिकाला बसला असून, हंगामही लांबणीवर गेला आहे. त्यामुळे घाऊक बाजारात जुन्या कांद्याच्या दराने उसळी मारली आहे होती. नाशिकमधील लासलगावमध्ये कांद्याचे ६० टक्के उत्पादन होते. लासलगाव हे कांद्याचे मोठे मार्केट आहे. मात्र, सध्या बाजारात कांद्याला जेवढी मागणी आहे त्या प्रमाणात पुरवठा होत नसल्यानं पुरवठ्यात कमतरता होत आहे. त्यामुळंच आहेत.

पुणे मार्केट यार्डात २१ ऑक्टोबरला ४० ते ५० ट्रक कांद्याची आवक झाली आहे. आवक सध्या कमी असली तरी कांद्याला मागणी अधिक आहे. अतिवृष्टीमुळे कांद्याच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. नवीन कांद्याचा हंगामही लांबला आहे. त्यामुळे मार्केट यार्डातील घाऊक बाजारात मंगळवारी कांद्याचे दर वाढले आहेत. केंद्र सरकारने यापूर्वीच कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. कांदा उपलब्ध होत असला तरी पावसामुळे जुना कांदा काही प्रमाणात खराब झाला आहे. तर, नवीन कांद्याचे पीक वाया गेल्यासारखेच आहे. त्यात नवीन कांदा हातात जो आला आहे त्याची प्रत खराब आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here