म.टा.प्रतिनिधी, नगर: ‘राज्यातील विरोधी पक्षाने शपथ घेऊन सांगावी की, त्यांनी त्यांच्या काळात सरसकट मदत कधी दिली,’ असे आव्हानच ग्राम विकास मंत्री तथा नगर जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी भाजपला दिले आहे. ‘अनेक वर्ष आम्ही राज्याचा कारभार केला आहे. जनतेला कशी मदत मिळवून द्यायची ते आम्हाला चांगलं माहित आहे. त्यांची नाळ आमच्या सोबत जोडली गेली आहे,’ असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

नगर जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पाथर्डी व शेवगाव तालुक्यातील भागाची मुश्रीफ हे पाहणी करीत आहे. यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना विरोधी पक्षावर तोफ डागली. शेतकऱ्यांना सरकारकडून कोणतीही मदत मिळत नाही , अशी टीका विरोधक करत आहे, असे त्यांना विचारले असता मुश्रीफ म्हणाले, ‘मागील सरकारने शपथ घेऊन सांगावे की त्यांनी त्यांच्या काळात सरसकट मदत कधी दिली होती. पंचनामे केल्याशिवाय ही मदत देता येत नाही. पंचनामे केल्याशिवाय सरकारला किती मदत द्यायच? याचे आकलन होत नाही. केंद्र सरकारचा सुद्धा आग्रह असतो , पंचनामे करावे,’ असं त्यांनी सांगितलं.

‘गेल्या वर्षी कोल्हापूरला महापूर आला तेव्हा सहा दिवसांनी फडणवीस आले होते. ते मुख्यमंत्री होते. त्यावेळेस सांगलीत कोल्हापुरात त्यांची हुरे उडवली होती. पुढे निवडणुकीमध्ये भाजपची एकही जागा कोल्हापूर जिल्ह्यात निवडून आली नाही. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना स्वतः कोथरूडला जाऊन उभे राहावे लागले. आता आम्ही काय करावं, हे त्यांनी आम्हाला सांगण्याची आवश्यकता नाहीये. अनेक वर्षे आम्ही राज्याचा कारभार केला आहे. आमच्यासोबत जनतेची नाळ जोडली गेली आहे. त्यामुळे जनतेला कशी मदत मिळवून द्यायची, हे आम्हाला कळते.’

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

130 COMMENTS

  1. [url=https://drugsoverthecounter.shop/#]over the counter medicine for anxiety and stress[/url] nystatin cream over the counter

  2. [url=https://drugsoverthecounter.shop/#]yeast infection treatment over the counter[/url] over the counter diet pills that work

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here