मुंबई: ‘भारतीय जनता पक्षामध्ये म्हणतील तीच पूर्व दिशा असं चित्र सध्या आहे. त्यामुळं पक्षात प्रचंड नाराजी आहे. खुद्द पक्षाचे प्रदेशाध्यक्ष यांनाही स्वत:चे निर्णय घेता येत नाहीत. त्यांनाही फडणवीसांचा सल्ला घ्यावा लागतो,’ असा गौप्यस्फोट यांनी केला आहे.

भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर खडसे यांनी काल पत्रकार परिषद घेऊन ‘मन की बात’ सांगितली. त्यानंतर आज ‘टीव्ही ९’ या वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी भाजपमधील सध्याच्या अंतर्गत राजकारणावर प्रकाश टाकला. भाजपमधील सामूहिक नेतृत्व संपल्याचा दावा त्यांनी केला. ‘२०१४ पर्यंत गोपीनाथ मुंडे, गिरीश बापट, भाऊसाहेब फुंडकर, मी, सुधीर मुनगंटीवार असे अनेक नेते, कार्यकर्ते एकत्र बसायचो. तासन् तास वेगवेगळ्या गोष्टींवर चर्चा करायचो. मग बहुमताने निर्णय व्हायचे. एकदा निर्णय झाला की मनाविरुद्ध असला तरी तो मान्य करायचो. अलीकडे ही प्रक्रिया भाजपमध्ये बंद झालीय,’ असं खडसे यांनी सांगितलं.

वाचा:

‘देवेंद्र फडणवीस सांगतील तीच पूर्व दिशा अशी सध्या स्थिती आहे. त्यामुळं पक्षात अनेक लोक नाराज आहेत. मात्र, पर्याय नसल्यामुळं ते सध्या बोलत नाहीत. अनेक जण माझ्याकडे बोलतात. चंद्रकांतदादाही स्वत:चे निर्णय स्वत: घेऊ शकत नाहीत. ते स्वत:ही तसं छातीठोकपणे सांगू शकत नाहीत. त्यांनाही फडणवीसांचा सल्ला घ्यावा लागतो,’ असं खडसे म्हणाले.

‘माझ्यासोबत १० ते १२ आमदार’

‘माझ्यासोबत भाजपचे १० ते १२ आमदार आहेत. पण ते आता येणार नाहीत, कारण आता निवडणुका परवडणार नाहीत. त्याशिवाय, १५ ते १६ माजी आमदार राष्ट्रवादीत येणार आहेत. त्यातील काही उद्या माझ्यासोबत येतील. सहकारी संस्था व पालिकांमधील अनेक पदाधिकारी माझ्यासोबत आहेत,’ असं खडसे यांनी सांगितलं.

वाचा:

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here