भाजपमध्ये जवळपास बाजूला करण्यात आलेल्या खडसे यांनी काल अखेर भाजपला धक्का देत सर्व पदांचा राजीनामा दिला. उद्या ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. खडसे यांच्यासारख्या मोठ्या नेत्याच्या पक्षांतरामुळं भाजपला धक्का बसला आहे. काही नेत्यांनी उघडपणे तशी कबुली दिली आहे. महाविकास आघाडीतील नेत्यांनी मात्र खडसे यांच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खडसे यांचं स्वागत करताना काल भाजपला टोला हाणला होता. त्यानंतर आता संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
वाचा:
‘एकनाथ खडसे यांनी तब्बल ४० वर्षे पक्षासाठी काम केले. आयुष्याच्या या टप्प्यावर डोळ्यात अश्रू घेऊन त्यांना पक्ष सोडावा लागत आहे. आता ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहेत. त्यांच्या या निर्णयामागे नक्कीच काहीतरी मोठं कारण असेल. कदाचित त्यांची राष्ट्रवादी सोबत त्यांची कुंडली जुळली असेल,’ असं राऊत म्हणाले.
वाचा:
खडसे शिवसेनेत जाणार असल्याची चर्चाही काही दिवसांपूर्वीपर्यंत होती. मात्र, त्यांनी राष्ट्रवादीची निवड केली. त्याचे कारण त्यांनी नुकतंच एका मुलाखतीमध्ये स्पष्ट केलं आहे. ‘मला , काँग्रेस व राष्ट्रवादी अशा तिन्ही पक्षांच्या ऑफर होत्या. मात्र, मी राष्ट्रवादीची निवड केली. कारण, उत्तर महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसकडे मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते आहेत. पण सक्षम असा मोठा नेता नाही. तिथं पक्षाचा विस्तार करण्यास वाव आहे. त्यामुळंच मी या पक्षाची निवड केली,’ असं त्यांनी म्हटलं आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times