जिनिव्हा : युरोपात आठवडाभरात ९ लाख २७ हजार करोनाबाधित रुग्ण आढळले असून, युरोपातील आठवड्याच्या रुग्णसंख्येने गेल्या आठवड्यात उच्चांक गाठला असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) म्हटले आहे. ‘डब्ल्यूएचओ’ने करोना विषाणूबद्दलचा जागतिक अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यामध्ये गेल्या आठड्यात युरोपात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २५ टक्क्यांनी वाढली असून, जगभरात एकूण नव्या रुग्णसंख्येत ३८ टक्के वाढ झाल्याचे यात म्हटले आहे. रशिया, चेक प्रजासत्ताक आणि इटली या देशांमध्ये युरोपातील नवीन रुग्णांपैकी निम्मे रुग्ण आढळले आहेत. युरोपातील मृतांची संख्याही वाढत असून, गेल्या आठवड्याच्या तुलनेत करोनामृत्यूंची संख्या एकतृतीयांश वाढली आहे. गेल्या आठवड्यात स्लोवानियामध्ये रुग्णसंख्येत ४,८९० इतकी वाढ झाली असून, ही वाढ १५० टक्के इतकी आहे.

तर, दुसरीकडे करोनाबाधितांची संख्या वाढत असताना युरोपीय देशांची काळजी आणखी एका कारणामुळे वाढली आहे. युरोपात करोनाची दुसरी लाट आली असताना करोनाबाधितांमध्ये वृद्धांची संख्या मोठी असल्याचे समोर आले असल्याचे ‘सीएनएन’ने म्हटले आहे. युरोपीयन सेंटर फॉर डिजीस प्रीव्हेंशन अॅण्ड कंट्रोलने याबाबतचा इशारा जारी केला आहे. जवळपास १३ युरोपीयन देशांमध्ये ६५ वर्ष व त्याहून अधिक वयाच्या नागरिकांमध्ये संसर्ग फैलावत असल्याचा इशारा देण्यात आला आहे. फ्रान्समध्ये मागील सहा आठवड्यात ६५ व त्यावरील अधिक वयांच्या बाधितांची संख्या तीनपटीने वाढली आहे.

वाचा:

करोनाच्या पहिल्या लाटेत बाधितांमध्ये वृद्धांची संख्या मोठी होती. त्यामुळे मृतांची संख्या वाढत असल्याचे समोर आले होते. करोनाच्या संसर्गामुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये वृद्धांचे प्रमाण अधिक आहे. वृद्धांना करोनाची बाधा झाल्यास आजारातून बरे होण्यासही वेळ लागतो. त्याचा भार रुग्णालयावर अधिक येत असल्याचे पहिल्या लाटेच्या वेळेस समोर आले. त्यामुळेच चिंता व्यक्त केली जात आहे.

वाचा:

वाचा:

फेरसंसर्गाचे प्रमाण दुर्मिळ

मेलबर्न : कोव्हिड-१९च्या रुग्णांवर उपचार करताना मेलबर्नमध्ये फेरसंसर्ग झाल्याच्या केसेस दुर्मीळ प्रमाणात आढळल्याचे ऑस्ट्रेलियातील प्रशासनाने म्हटले आहे. एकेकाळी करोनाचा हॉटस्पॉट असलेल्या व्हिक्टोरिया राज्यात जुलैमध्ये करोनाबाधित आढळलेल्या रुग्णाला मंगळवारी पुन्हा संसर्ग झाल्याचे दिसून आले. तज्ज्ञांच्या समितीने या रुग्णात जुलैमधील संसर्गाच्या विषाणूंचा अवशेष राहिल्याचे न मानता, ही केस फेरसंसर्गाची असल्याचे वर्गीकरण केले आहे, असे व्हिक्टोरियाचे मुख्यमंत्री डॅन अँड्र्यूज यांनी म्हटले आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here