राजकोट:
एकदिवसीय आंतरराष्ट्रीय मालिकेतल्या दुसऱ्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर ३६ धावांनी विजय मिळवत पहिल्या सामन्याचं उट्ट्ं काढलं. या मालिकेत आता भारताची ऑस्ट्रेलियाशी १-१ अशी बरोबरी झाली आहे.

मालिकेतल्या पहिल्या सामन्यात झालेल्या लाजिरवाण्या पराभवानंतर शुक्रवारी भारतीय संघ जणू सूडाच्या भावनेने पेटला होता. टीम इंडियाने ५० षटकांत ६ विकेट्सवर ३४० धावांचा दणदणीत स्कोअर केला. ३४० धावांचे आव्हान पेलताना ऑस्ट्रेलियाची दमछाक झाली. स्टीव्ह स्मिथ ९८ धावांवर बाद झाल्याने त्याचं शतक हुकलं. स्मिथची फलंदाजी ऑस्ट्रेलियाला मात्र तारू शकली नाही.

दुसरीकडे, शिखर धवनची दमदार ९६ धावांची खेळी भारतीय धावसंख्येला मोठं बळ देऊन गेली. शिखर याच्या ९६ धावांसह लोकेश राहुलच्या ८० धावा आणि कर्णधार विराट कोहलीच्या ७८ धावांच्या जोरावर भारताला ३४० धावांचा डोंगर उभा करता आला. फलंदाजीच्या वेळी जायबंदी झालेला शिखर धवन क्षेत्ररक्षण करण्यासाठी मैदानात उतरला नव्हता. त्याच्या जागी युजवेंद्र चहल आला होता. जायबंदी ऋषभ पंतच्या जागी मनीष पांडे तर शार्दुल ठाकूरच्या जागी नवदीप सैनीला आजच्या सामन्यात संधी देण्यात आली होती.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here