साताराः सध्या राज्याचे वातावरण हे दिशाहीन असून ज्यांनी आपल्याला मतदान केले त्या मतदारांची ससेहोलपट होत आहे. आता राज्याची सूत्रे यांनी ताब्यात घ्यावीत, असं मत यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केलं आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या सोबत साताऱ्यात नुकसानीची पाहणी करताना उदयनराजे बोलत होते.

राज्यात भाजपला बहुमत मिळवून फक्त राजकारणामुळे सत्ता मिळाली नाही. केवळ स्वार्थासाठी आलेली आजची महाविकास आघाडी सरकारची अवस्थाही अस्थिर आहे. त्यामुळे निर्णायक निर्णय होत नाहीत. सरकार कोणाचेही असुदेत स्थिरता असेल तरच शासन करू शकतो. कोणत्याही आमिषाला बळी न पडता केवळ उद्दिष्टांसाठी लोक कल्याणासाठी जे एकत्र आलेले असतात तेच लोकराज्य स्थिर सरकार देत असतात. एकत्र ठेवण्यासाठी कुठल्याही प्रकारची ताकद आणि ताकदीचा उपयोग करावा लागत नाही, असा टोला त्यांनी लगावला आहे.

राज्यात लोकांना स्थिर सरकार हवे आहे. त्यामुळे मला खात्री आहे लवकरच राज्यात काही तरी चांगले घडेल, असा विश्वासही उदयनराजे यांनी व्यक्त केला आहे.एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाबद्दलही उदयनराजे यांनी भाष्य केलं आहे. ‘मी, कोण काय बोलतो याचे उत्तर द्यायला बांधील नाही आणि हा काही सवाल-जबाबचा कार्यक्रम नाही, असं ते म्हणाले आहेत.

दरम्यान, देवेंद्र फडणवीस हे अतवृष्टीग्रस्त भागांत झालेल्या नुकसानीचा दौऱ्यावर होते. या, दरम्यान त्यांनी अनेकदा शेतकऱ्यांना मदतीवरून राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. अतिवृष्टीमुळे शेती व पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना सरसकट मदत मिळावी यासाठी राज्य सरकारकडे आग्रह धरणार आहे, असंही फडणवीस म्हणाले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here