नवी दिल्ली : भारतीय रेल्वेकडून आपल्या कर्मचाऱ्यांना मोठी खुशखबर देण्यात आलीय. करोना संक्रमणकाळात रेल्वेला मोठा फटका बसला असला तरीदेखील रेल्वेकडून आपल्या ११.५८ लाख ‘नॉन – गॅझेटेड’ कर्मचाऱ्यांना जाहीर करण्यात आलाय. या कर्मचाऱ्यांना २०१९-२० साठी जवळपास अडीच महिन्यांचा पगार बोनस म्हणून देण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाकडून रेल्वेच्या या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आलीय.

नुकत्याच झालेल्या बैठकीत केंद्रीय मंत्रिमंडळानं रेल्वे मंत्रालयाच्या सर्व पात्र नसलेल्या ‘नॉन गॅझेटेड’ कर्मचार्‍यांना (आरपीएफ / आरपीएसएफ कर्मचार्‍यांना सोडून) २०१९-२० साठी उत्पादनाच्या आधारावर ७८ दिवसांचा पगार बोनस म्हणून देण्याचा प्रस्ताव मान्य केलाय. रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी उत्पादकता आधारित एकूण बोनस अंदाजे २१८१.६८ कोटी रुपये आहे.

वाचा :

वाचा :

रेल्वे कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या या बोनसमुळे रेल्वे प्रशासनावर २०८१.६८ कोटी रुपयांचा आर्थिक भार पडण्याचा अंदाज आहे. बोनससाठी पात्र नॉन गॅझेटेड रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी वेतन मूल्यांकन मर्यादा ७००० रुपये प्रती महिना निश्चित करण्यात आलीय. रेल्वे मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, रेल्वे कर्मचाऱ्यांना यामुळे जास्तीत जास्त १७,९५१ रुपयांचा बोनस मिळू शकेल.

रेल्वेच्या उत्पादकता आधारित बोनसमध्ये सर्व नॉन गॅझेटेड कर्मचाऱ्यांचा (आरपीएफ / आरपीएसएफ कर्मचारी वगळता) समावेश आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांना दरवर्षी दूर्गा पूजा, दसऱ्यापूर्वीच बोनस दिला जातो. ‘बोनससाठी पात्र असलेल्या रेल्वे कर्मचार्‍यांना दरवर्षी दूर्गा पूजा, दसऱ्यापूर्वीच बोनस मिळतो. यंदाही मंत्रिमंडळाच्या निर्णयाची अंमलबजावणी दसऱ्यापूर्वीच होणईल’ असं रेल्वे प्रशासनाकडून आश्वासन देण्यात आलंय.

करोना काळात संकटाचा सामन करत प्रवाशांना सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना या बोनसमुळे रेल्वे कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन मिळू शकेल, अशी आशा प्रशासनानं व्यक्त केलीय.

वाचा : वाचा : वाचा :

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here