मुंबईः आज १९८ करोना बाधितांचा मृत्यूची नोंद झाली असून राज्यातील करोनामृतांची एकूण संख्या ४२ हजार ८३१ इतकी झाली आहे. तर, आज राज्यात १६ हजार १७७ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

राज्यात करोनाची लाट ओसरताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून करोना रुग्णांचा आकडाही झपाट्यानं कमी होत आहे. आज सलग दुसऱ्या दिवशीही रुग्ण बरे होण्याऱ्यांचे प्रमाण वाढलं आहे. त्यामुळं राज्यातील नागरिकांना व आरोग्य प्रशासनाला मोठा दिलासा मिळाला आहे. आत तब्बल १६ हजार १७७ रुग्ण बरे करोनामुक्त झाले आहेत त्यामुळं आजपर्यंत एकूण १४ लाख ३१ हजार ८५६ रुग्णांनी करोनावर यशस्वी मात केली आहे. त्यामुळं राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८८. १ टक्क्यांवर पोहोचले आहे.

आज राज्यातील करोना बाधित रुग्णांची संख्याही कमी होताना दिसतेय. आज तब्बल ७ हजार ५३९ नवीन रुग्णांचं निदान झालं आहे. त्यामुळं राज्यात एकूण १६ लाख २५ हजार १९७ रुग्णांची नोंद झाली आहे. तर, राज्यात सध्या १ लाख ५० हजार ०११ अॅक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर राज्यातील विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८४ लाख ०२ हजार ५५९ करोना चाचण्यांचा अहवाल १६ लाख २५ हजार १९७ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सध्या राज्यात २४,५९,४३६ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २४,६२१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here