जळगाव: ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे प्रवेशासाठी आज दुपारी सहकुटुंब मुंबईला विशेष चार्टर्ड हेलिकॉप्टरने रवाना झाले. मुंबईत उद्या शुक्रवारी (दि.२३) राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा याच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे. ( will join tomorrow )

वाचा:

एकनाथ खडसे यांनी काल दुपारी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यानंतर काही वेळातच मुंबईत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष यांनी खडसे हे शुक्रवारी दुपारी दोन वाजता मुंबईत शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची घोषणा केली होती. या साऱ्या घडामोडींनंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठा भूकंप झाला.

वाचा:

एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची निश्चितता झाल्यानंतर त्यांच्या आजच्या मुंबई दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. खडसेंसोबत कोण कोण मुंबईत जाणार याबाबत खूप उत्सुकता होती. अखेर ते सहकुटुंब मुंबईला रवाना झाले. खडसेंसोबत त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे, कन्या अॅड. तसेच केअर टेकर गोपाळ चौधरी हे देखील हेलिकॉप्टरमध्ये आहेत. त्यांना निरोप देण्यासाठी त्यांच्या समर्थकांची मुक्ताई साखर कारखान्याच्या आवारात मोठी गर्दी झाली होती.

वाचा:

राष्ट्रवादी खडसेंच्या स्वागतासाठी उत्सुक

एकीकडे खडसे यांनी जळगावातून टेक-ऑफ घेतला असताना दुसरीकडे त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची जय्यत तयारी सुरू झाली आहे. राष्ट्रवादीने उद्याच्या कार्यक्रमाबाबत एक प्रसिद्धीपत्रक काढलं आहे. ‘भाजप नेते हे उद्या (शुक्रवारी) राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. एकनाथ खडसे यांच्या प्रवेशाने राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढणार असल्याने हा प्रवेश सोहळा तितकाच महत्त्वाचा ठरणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात शुक्रवार दिनांक २३ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता हा प्रवेश होणार असून याची तयारी करण्यात आली आहे. यावेळी एकनाथ खडसे आणि त्यांचे कार्यकर्ते याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे वरीष्ठ नेतेही उपस्थित राहणार आहेत’, असे पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

वाचा:

दरम्यान, खडसे यांचा राष्ट्रवादी प्रवेश हा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्र भाजपासाठी खूप मोठा धक्का ठरणार आहे. राज्याच्या राजकारणातील ही खूप मोठी घडामोड ठरणार असून येत्या काळात राजकारण खूपच रंगतदार होण्याची चिन्हे आहेत.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here