पाटणाः बिहारची ( ) राजधानी पटणा येथील काँग्रेसचे कार्यालय सदाकत आश्रमात ( congress office patna ) प्राप्तिकर विभागाने पथकाने ( income tax officials raid ) छापा टाकला. यावेळी कार्यालयाच्या बाहेर उभ्या असलेल्या कारमध्ये प्राप्तिकर विभागाला ८.५ लाख रुपये आढळून आलेत. या प्रकरणी कॉंग्रेसचे नेते रणदीप सुरजेवाला आणि बिहारचे प्रभारी शक्तीसिंह गोहिल यांची चौकशी केली गेली.

प्राप्तिकर विभागाच्या पथकाने कॉंग्रेसच्या कार्यालयावर नोटीस चिकटवली आहे. हे पैसे कोणाचे आहेत हे आपल्याला माहिती नाही, असं शक्तीसिंह गोहिल म्हणाले. मिळालेल्या माहितीनुसार प्रातिकर विभागाच्या पथकाकडून एक तास छापेमारी सुरू होती.

याप्रकरणी प्राप्तिकर विभागाने एका व्यक्तीला ताब्यात घेतलं आहे. ही रक्कम पाटण्यात कुणाला तरी देण्यात येणार होती, असं त्याने सांगितलं. तर प्राप्तिकर विभागाने या संपूर्ण प्रकरणी कॉंग्रेसकडून स्पष्टीकरण मागितलं आहे. हा पैसा कुठून आला आणि पकडलेल्या व्यक्तीला कोणत्या नेत्याने पैसा दिला, असे प्रश्न प्राप्तिकर विभागाने काँग्रेसला केले आहेत.

शक्तीसिंह गोहिल यांनी प्राप्तिकर विभागाला केले लक्ष्य

त्याचवेळी शक्तीसिंग गोहिल यांनी प्राप्तिकर विभागाला लक्ष्य केलं आहे. पक्ष कार्यालयाच्या बाहेर उभ्या असलेल्या कारमध्ये पैसे सापडले आहेत. या प्रकरणी प्राप्तिकर विभागाने पक्षाला नोटीस दिली आहे. काँग्रेस कार्यालयाच्या आवारात रक्कम आढळून आलेली नाही. आम्ही तपासात सहकार्य करू, असं शक्तीसिंह गोहिल म्हणालेत. रक्सौल येथील भाजप उमेदवाराकडून २२ किलो सोने, अडीच किलो चांदी जप्त करण्यात आली. आयकर विभागाने तिथे छापा का टाकला नाही, असा प्रश्न त्यांनी केला.

कॉंग्रेस कार्यालयाच्या बाहेर पैसे सापडल्याने आता राजकारणही सुरू झालं आहे. सत्ता स्थापनेपूर्वीच महाआघाडीच्या नेत्यांनी लूटमार सुरू केली आहे. प्राप्तिकर विभागाने महायुतीच्या नेत्यांवर छापे घालायला हवेत. अब्जावधी रुपये सापडतील त्यांच्याकडे. महाआघाडीचे नेते लूट आणि घोटाळ्याच्या पैशांद्वारे निवडणुका लढवत आहेत, असा आरोप बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांनी केलाय.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here