म. टा. प्रतिनिधी, पुणेः शिवाजीनगर येथील जम्बो कोविड सेंटरमध्ये एका महिला डॉक्टरचा विनयभंग केल्याप्रकरणी दोघा डॉक्टरांचा अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला. अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. यु. मालवणवर यांच्या कोर्टाने हा अर्ज फेटाळला.
करोना संकटाच्या काळात जम्बो कोविड सेंटरमध्ये असा प्रकार घडणे गंभीर गोष्ट असून याप्रकरणाचा तपास होणे आवश्यक आहे, असे कोर्टाने आदेशात नमूद करत अर्जदार वकिलांचा जामीन फेटाळला.
याप्रकरणी, योगेश भद्रा आणि अजय बागलकोट या दोघांनी अटकपूर्व जामीन मिळावा म्हणून कोर्टात अर्ज दाखल केला होता. त्यांच्या जामीन अर्जाला सरकारी वकील मारुती वाडेकर यांनी विरोध केला.
याप्रकरणी एका २५ वर्षीय महिला डॉक्टरने फिर्याद दाखल केली आहे. २९ सप्टेंबरला रात्री दोनच्या सुमारास हा प्रकार घडला होता.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times