मुंबईः बॉलिवूडचा सिंघम , अभिनेत्री काजोल आणि अभिनेता सैफ अली खान यांच्या प्रमुख भूमिका असणाऱ्या ‘: द अनसंग वॉरिअर’ चित्रपटाने आठवडाभरात बॉक्स ऑफिसवर तब्बल ११६ कोटी रुपयांची कमाई केली आहे. या चित्रपटाने केवळ पहिल्या सहा दिवसांत १०० कोटींचा टप्पा ओलांडला होता.

मुख्य भूमिकेत असणारा ‘छपाक’ आणि ‘तान्हाजी: द अनसंग वॉरिअर’ हे दोन्ही चित्रपट एकाच दिवशी म्हणजे १० जानेवारी रोजी प्रदर्शित झाले होते. जेएनयू विद्यार्थ्यांना भेटायला गेल्याप्रकरणी दीपिका पदुकोणच्या चित्रपटावर बहिष्कार घालण्यात यावा, असे आवाहन समाजमाध्यमांवर करण्यात आले होते. दोन्ही चित्रपटामध्ये स्पर्धा असल्याचे बोलले जात होते. मात्र, छपाक चित्रपटाला धोबीपछाड देत तान्हाजी चित्रपटाने १०० कोटींचा टप्पा सहज गाठला.

पहिल्या आठवड्यातील गुरुवारीदेखील म्हणजे १६ जानेवारी रोजी तान्हाजी चित्रपटाने ११ कोटी रुपयांपेक्षा अधिक गल्ला जमवला. तर दुसरीकडे, छपाक चित्रपटाने पहिल्या आठवड्यात अवघ्या २६ कोटी रुपयांची कमाई केली.

दरम्यान, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशमध्ये तान्हाजी चित्रपट केला. यानंतर हरियाणामध्येही हा चित्रपट करमुक्त करण्यात आला. महाराष्ट्रात ‘तान्हाजी’ करमुक्त करण्यासंदर्भात राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत एकमत झाले. स्वराज्यासाठी ज्यांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले, त्या तान्हाजी मालुसरे यांच्या जीवनावर आधारित ‘तान्हाजी’ हा चित्रपट करमुक्त करावा, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली होती.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here