दुबई: आयपीएलच्या १३व्या हंगामात गुरुवारी झालेल्या सामन्यात सनरायजर्स हैदराबादने राजस्थान रॉयल्सवर ८ विकेटनी विजय मिळवला. राजस्थान रॉयल्सने दिलेले १५५ धावांचे लक्ष्य हैदराबादने २ विकेटच्या बदल्यात पार केले. हैदराबादकडून मनिष पांडेने नाबाद ८३ तर विजय शंकरने नाबाद ५२ धावा केल्या. या विजयामुळे हैदराबादने प्ले ऑफमध्ये पोहोचण्याच्या आशा अद्याप जिवंत ठेवल्या आहेत.

वाचा-

आयपीएलमधील आठ संघांपैकी मुंबई इंडियन्स वगळता सर्व संघांचे १० सामने झाले आहेत. तरी कोणताही संघ अद्याप प्ले ऑफच्या शर्यतीतून बाहेर पडलेला नाही. चौथ्या स्थानासाठी पाच संघात लढत आहे. यात चेन्नई, राजस्थान, कोलकाता आणि हैदराबाद यांचा समावेश आहे. हैदराबादने आज मिळवलेल्या विजयामुळे त्यांचे १० पैकी ४ विजयासह ८ गुण झाले आहेत आणि ते गुणतक्त्यात पाचव्या स्थानावर आहेत. तर राजस्थान ११ पैकी ४ विजयांसह सातव्या क्रमांकावर आहे.

वाचा-

दिल्ली कॅपिटल्स अद्याप अव्वल स्थानी असून त्यांच्याकडे १० पैकी ७ विजयांसह १४ गुण आहेत. तर रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू देखील तितक्याच गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. मुंबई इंडियन्सचे १२ गुण असून उद्या (शुक्रवारी) त्यांची लढत चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध होणार आहे. कोलकाता नाइड रायडर्स १० गुणांसह चौथ्या स्थानावर आहे.

वाचा-

किंग्ज इलेव्हन पंजाबने सलग तीन विजय मिळवत गुणतक्त्यात सहावे स्थान मिळवले आहे. राजस्थान सातव्या तर चेन्नईने १० पैकी फक्त ३ सामन्यात विजय मिळवला असून ते अखेरच्या स्थानावर आहे.

वाचा-

यावेळी आयपीएलमध्ये चौथ्या स्थानासाठी नेट रनरेट हा मुद्दा कळीचा ठरणार असे सध्या तरी दिसत आहे.

वाचा-

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here