मुंबई: येथील मध्ये भीषण आग लागली असून या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे सांगण्यात आले आहे. आग लागली तेव्हा काही जण मॉलमध्ये होते. प्रसंगावधान राखत त्या सर्वांना सुखरूपपणे मॉलबाहेर काढण्यात आले आहे. दरम्यान, आगीचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. ( Latest Updates )

सिटी सेंटर मॉलला लागूनच काही इमारती असून आगीच्या घटनेने येथील सर्वच रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. रात्रीची वेळ असल्याने व आग पसरण्याचा संभाव्य धोका लक्षात घेऊन या इमारतींमधील रहिवाशी घर सोडून बाहेर आले आहेत. आगीबाबत माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहेत. ‘लेवल-३’ची आग असल्याचे जाहीर करण्यात आले असून ८ फायर इंजिनच्या साह्याने आग आटोक्यात आणण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे.

महत्त्वाचे अपडेट्स…

– सिटी सेंटर मॉलमध्ये रात्री ८ वाजून ५३ मिनिटांच्या सुमारास आगीचा भडका उडाला. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

– आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. आगीत कोणीही जखमी झालेले नाही, असे अग्नशमन अधिकाऱ्याने सांगितले.

– मॉलमध्ये मोबाइल फोन अॅक्सेसरिजची दुकाने मोठ्या प्रमाणात आहेत. या दुकानांचे मोठे नुकसान झाले आहे.

– गुरुवारी दिवसभरातील मुंबईतील ही दुसरी आगीची घटना ठरली. त्याआधी कुर्ला पश्चिमेकडे एका गार्मेंट फॅक्टरीत आग लागली होती. ती आग दोन तासांच्या प्रयत्नांनंतर आटोक्यात आणली गेली.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here