नगर: ‘ यांचा गेम करून देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधण्यासाठी राष्ट्रवादीने त्यांना पक्षात घेतले आहे,’ अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते यांनी सातारा येथे बोलताना केली होती. या टीकेला ग्रामविकास मंत्री यांनी प्रत्युत्तर देताना, ‘हे म्हणजे चहा पेक्षा किटली गरम झाली आहे,’ असा टोला लगावला. ( Slams )

वाचा:

‘देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल खडसे यांची जी तक्रार आहे, जी खदखद आहे, ती आजची नसून चार वर्षाची आहे. त्यामुळे तुम्ही चार वर्ष का गप्प बसलात? त्यांची का मनधरणी केली नाही? असा सवाल उपस्थित करतानाच, खडसे जावेत असेच त्यांना वाटत असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले. नगर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करून मुश्रीफ यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांना दरेकर यांनी सातारा येथे केलेल्या वक्तव्याबाबत विचारले असता ते म्हणाले, ‘हे म्हणजे आता चहापेक्षा किटली गरम झाली आहे. फडणवीस यांच्याबद्दल खडसे हे चार वर्षापासून बोलत आहेत. ते काही आता पहिल्यांदा बोलत नाहीत. चार वर्षात दरेकर यांनी खडसे यांची मनधरणी करून त्यांचे गैरसमज दूर केले पाहिजे होते. प्रवीण दरेकर यांना कोणी रोखले नव्हते. त्यांनी जाऊन खडसे यांच्या पाया पडले पाहिजे होते, कारण खडसे सीनिअर आहेत. दरेकर हे तर आता मध्ये जाऊन विरोधी पक्षनेते झाले आहेत. त्यामुळे त्यांनी सीनिअर माणसाला रोखण्याची आवश्यकता होती,’ असा टोलाही त्यांनी लगावला.

वाचा:

‘खडसे यांची देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल जी तक्रार आहे, खदखद आहे, ती आजची नाही तर चार वर्षांची आहे. खडसे हे विधानसभा निवडणुकीच्या वेळी सुद्धा सांगत होते, माझे काय चुकले, हे तुम्ही येऊन बोला. त्यामुळे तुम्ही चार वर्ष का गप्प बसलात ? त्यांची का मनधरणी केली नाही ? मला वाटते, खडसे जावेत असेच त्यांना वाटत असावे,’ असेही मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.

शेतकरी म्हणाले, साहेब अन्न सुद्धा गोड लागेना!

‘साहेब, आमचा ऊसतोड कामगारांचा तालुका आहे. थोडेफार शेतीतून भागते, पण पावसामुळे एवढी परिस्थिती गंभीर झाली की, साहेब आता अन्न सुद्धा गोड लागेना,’ अशा भावना व्यक्त करतानाच ‘आता तुह्मीच आह्माला मदत करा,’ असे साकडेच पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना शेतकऱ्यांनी घातले. यावर, ‘काळजी करू नका, जास्तीत जास्त मदत करून तुमची दिवाळी गोड करू,’ असे सांगतानाच मुश्रीफ यांनी शेतकऱ्यांना धीर दिला. नगर जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जिल्ह्यात सर्वात जास्त फटका हा पाथर्डी, शेवगाव तालुक्यातील गावांना बसला आहे. आज पाथर्डी व शेवगाव तालुक्यात मंत्री मुश्रीफ यांनी भेट देत नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांनी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा कसा परिणाम झाला आहे, याचे गाऱ्हाणेच त्यांच्यासमोर मांडले.

वाचा:

मुश्रीफ यांना दाखवला सडका कांदा

पाथर्डी येथून मंत्री मुश्रीफ हे पाहणीसाठी निघाले असता खरवंडी कासार जवळ त्यांची गाडी काही शेतकऱ्यांनी अडवली. यावेळी शेतकऱ्यांनी त्यांना सडका कांदा, जळलेली पिके दाखवली. लवकरात लवकर मदत करा, अशी मागणीही त्यांनी केली. त्यावर मुश्रीफ म्हणाले, ‘आठ दिवसाच्या आत पंचनामे करून तुम्हाला नुकसान भरपाई दिली जाईल. जास्तीत जास्त मदत देण्याचा आमचा प्रयत्न असेल.’ त्यानंतर मात्र गाडी अडवणाऱ्या शेतकऱ्यांनी मुश्रीफ यांना टाळ्या वाजवत निरोप दिला.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here