वाचा:
कोल्हापूर जिल्ह्यात जूनपर्यंत करोनाचा कहर फारसा नव्हता. मात्र जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या प्रचंड वाढली. जुलैमध्ये सतरा हजार तर ऑगस्ट महिन्यात वीस हजार बाधित आढळल्याने ऑक्टोबरपर्यंत एकूण आकडा ४७ हजारावर पोहोचला. दीड हजारावर रुग्णांचा यामध्ये बळी गेला. रोज हजारावर रुग्ण वाढत गेल्याने प्रशासन व आरोग्य यंत्रणा हतबल झाली. काहींचा उपचाराअभावी तडफडून जीव गेला. यामुळे जिल्ह्यात भीतीचे वातावरण पसरले. उपचार करण्यासाठी सरकारी आणि खासगी दवाखान्याबरोबरच अनेक सामाजिक संस्थांनी देखील कोविड सेंटर सुरू केले. त्यामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला.
वाचा:
ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच जिल्ह्यातील रुग्णसंख्या कमी होत आहे. गेल्या आठ ते दहा दिवसात रोजचा आकडा शंभराच्या आत आहे. सध्या दीड हजारावर अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. जिल्ह्यात ९६ कोविड सेंटर सुरू करण्यात आले होते. आता त्यामधील ४६ सेंटर बंद करण्यात आले आहेत. येत्या आठ दिवसात अजूनही काही सेंटर बंद करण्यात येणार आहेत. कारण काही सेंटरवर सध्या एकही रुग्ण नाही. खासगी दवाखान्यात इतर आजार असणाऱ्या रुग्णांवर उपचार करण्यास बेड उपलब्ध होत आहेत.
प्रशासनाचे खबरदारी बाळगण्याचे आवाहन
गेल्या काही दिवसात रुग्णसंख्या घटत गेल्याने करोनाची भीती कमी झाली आहे. करोना संपला असे गृहित धरून अनेकजण सुरक्षितता पाळण्याकडे दुर्लक्ष करत आहेत. मास्क तोंडाऐवजी हनुवटीला बांधतानाच सुरक्षित अंतराच्या नियमाचा पूर्ण फज्जा उडवला जात आहे. हॉटेल व सर्व दुकाने सुरू झाल्याने गर्दी वाढत आहे. दसरा आणि दिवाळीच्या निमित्ताने संपर्क आणि गर्दी वाढणार आहे. यामुळे दिवाळीनंतर पुन्हा करोनाची लाट येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. जगातील अनेक देशात लाट पुन्हा आली आहे. यामुळे त्याला रोखण्यासाठी अधिक काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
जिल्ह्यात आणखी एक करोनाची लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे गाफील आणि बेफिकीर राहू नका. या लाटेला रोखण्यासाठी मास्क, हातांची स्वच्छता आणि सुरक्षित अंतराचा नियम पाळणे अत्यावश्यक आहे. मधुमेह, रक्तदाब असणाऱ्यांनी व वयोवृद्धांनी अधिक काळजी घ्यायला हवी- डॉ.अजय केणी, अॅस्टर आधार हॉस्पिटलइतर अनेक देशात करोनाची साथ पुन्हा आली आहे. ज्यांना यापूर्वी संसर्ग झाला असेल, त्यांच्यातील प्रतिकारशक्ती कमी होण्याची शक्यता असते. ज्यांना किरकोळ लक्षणे जाणवली असतील, त्यांनाही पुन्हा करोनाची बाधा होऊ शकते. यामुळे सर्वांनीच अधिक काळजी घेण्याची गरज आहे -डॉ. साई प्रसाद, कोल्हापूर
जिल्ह्यातील करोना बाधित- ४७५५९
बरे झालेले रुग्ण- ४३९८२
सध्या उपचार सुरू- १९७३
करोना बळी- १६१४
वाचा:
सांगलीतही लाट ओसरतेय
सांगली: करोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन रुग्णांवर उपचारासाठी काही खासगी रुग्णालये कोविड रुग्णालये म्हणून घोषित व कार्यान्वित करण्यात आली होती. सद्यस्थितीत कोविड रुग्णांची संख्या कमी होत आहे. रुग्णांवर उपचारासाठी उपलब्ध खाटांची संख्या आवश्यक प्रमाणात शिल्लक राहत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्या अध्यक्षतेखालील आढावा बैठकीत झालेल्या चर्चेनुसार जिल्ह्यातील ९ रुग्णालये २६ ऑक्टोबरपासून नॉन कोविड रुग्णालये म्हणून सुरू ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. यामध्ये सांगलीतील डॉ. शरद घाडगे यांचे घाडगे मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, डॉ. महेश दुदनकर यांचे दुदनकर हॉस्पिटल, डॉ. अनिल मडके यांचे श्वास हॉस्पिटल, डॉ. महेश जाधव यांचे अपेक्स हॉस्पिटल (मिरज), डॉ. रवींद्र वाळवेकर यांचे भगवान महावीर कोविड हॉस्पिटल, डॉ. दीपक शिखरे यांचे लाइफकेअर हॉस्पिटल, डॉ. चोपडे यांचे दक्षिण भारज जैन समाज हॉस्पिटल सांगली, डॉ. सचिन सांगरूळकर यांचे साई मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल (इस्लामपूर) व डॉ. शालिवाहन पट्टणशेट्टी यांचे मयूरेश्वर हॉस्पिटल (जत) या रुग्णालयांचा समावेश आहे. सांगलीत गुरुवारी नवे २५६ रुग्ण आढळले, तर २६४ रुग्ण करोनामुक्त झाले. उपचारादरम्यान पाच रुग्णांचा मृत्यू झाला.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times