नवी दिल्लीः देशात करोना व्हारसचा ( coronavirus ) प्रादुर्भाव वाढतच आहे. काही अहवालांमधून हिवाळ्यात करोना संसर्ग आणखी वाढ होण्याची भीती व्यक्त केली गेली आहे. केंद्र आणि राज्य सरकारे करोना संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. पण नवीन अजूनही मोठ्या संख्येने समोर येत आहेत. करोनाच्या गंभीर रुग्णांवर प्लाझ्मा थेरपीचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातोय. या मुद्द्यावर दिल्लीतील एम्सचे संचालक ( director) ( ) मोठं वक्तव्य केलं आहे. प्लाझ्मा थेरपीमुळे करोना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण कमी झालेला नाही, असं गुलेरिया यांनी म्हटलंय.

आयसीएमआरने केलेल्या सूक्ष्म निरिक्षणानंतर डॉ. गुलेरिया यांनी माहिती दिली. एखाद्या रुग्णाच्या शरीरात आधीपासूनच अँटीबॉडीज असतील तर त्याला बाहेरून त्या दिल्यास त्याचा फार फायदा होणार नाही. प्लाझ्मा थेरपीमुळे करोना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण कमी झालेले नाही, असं ते म्हणाले.

प्लाझ्मा ही जादूची गोळी नाही. आपल्याला या पद्धतीचा योग्य उपयोग करायला हवा. प्लाझ्मा थेरपीचा प्रत्येकाला फायदा होईल, असं नाही. आपल्याला ते उपयुक्त ठरेल तिथेच त्याचा योग्य प्रकारे उपयोग करावा लागेल. योग्य वेळी उपचार मिळाल्यासच त्याचा फायदा होऊ शकतो, हेच करोनातून आपण शिकलोय, असं डॉ. रणदीप गुलेरिया म्हणाले.

हिवाळ्यामध्ये स्वाइन फ्लूच्या रुग्णांत वाढ दिसून येते. करोनाच्या बाबतीतही असंच काहीसं घडण्याची शक्यता आहे. असा डेटा ही समोर आलाय. हवेच्या प्रदूषणातून संसर्ग खूप वेगानं वाढत असल्याचं समोर आलंय. हे इटली आणि चीनमध्ये गेल्या काही महिन्यांत झालेल्या अभ्यासावर आधारित आहे, असं डॉ. रणदीप डॉ. गुलेरिया म्हणाले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here