पिंपरी: सोसायटीमध्ये नवरात्रीच्या उत्सवानिमित्त दांडियाचा कार्यक्रम घेणाऱ्या सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संसर्गाच्या काळात कोणत्याही प्रकारचे सण-उत्सव एकत्रित येऊन, गर्दी करून साजरे न करण्याचे शासनाचे आदेश असताना देखील येथील एका सोसायटीत हा कार्यक्रम घेण्यात आला होता. ( Latest Updates )

वाचा:

जलाराम पार्क हाऊसिंग सोसायटीचे प्रभारी सचिव प्रफुल्ल दत्तात्रय माळवदे, अध्यक्ष प्रताप विजू शेवाळकर, उपाध्यक्ष महादेव पाटील अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलीस कर्मचारी मच्छिंद्र नागनाथ शेंडे यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

वाचा:

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्य शासनाच्या निर्णयानुसार उत्सवात गरबा, आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. तसेच पोलीस आयुक्तांनी शहर परिसरात जमावबंदीचे आदेश दिले आहेत. या आदेशांचे उल्लंघन करून नवरात्रीच्या उत्सवानिमित्त जलाराम पार्क हाऊसिंग सोसायटीच्या आवारात १५ ते २० महिला-पुरुषांना एकत्र जमवून दांडिया कार्यक्रम भरवण्यात आला. याबाबत पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम १८८, २६९, २७०, महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १३५, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ चे कलम ५१ नुसार गुन्हा दाखल केला आहे. आळंदी पोलीस पुढील तपास करीत आहेत.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here