नवरात्रीच्या कार्यक्रमात दुर्गा पूजेनंतर ही तरुणी आपल्या घरी जात होती. यानंतर तीन तरुणांनी रस्त्यावरून तिचं अपहरण केलं आणि निर्जन जागी नेऊन तिच्यावर केला. ही घटना बुधवारी रात्रीची आहे.
पानवाडी भागात बलात्काराची घटना समोर आली आहे. पोलिसांनी तातडीने कारवाई केली असून तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक अरुण कुमार श्रीवास्तव यांनी दिली.
आरोपी तरुणीला आपल्या घरामागील एका निर्मनुष्य ठिकाणी नेलं आणि तिच्यावर अत्याचार केला. या प्रकरणी बुधवारी रात्रीच आरोपींना अटक करण्यात आली. पीडित तरुणीला वैद्यकीय तपासणी पाठवण्यात आलं आहे. याप्रकरणी पोलिस तपास करत आहेत.
पंजाबमध्ये ६ वर्षाच्या मुलीवर बलात्कार
पंजाबच्या होशियारपूरमध्ये एका ६ वर्षाच्या मुलीवर कथित बलात्कार आणि नंतर तिची हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या भयंकर घटनेत गावातील एका घरात मुलीचा अर्धा जळालेला मृतदेह आढळून आला आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times