नगर : ग्रामपंचायतीत नोकरी होती पण पगार थकलेला. वडिलांची शेती आहे, आधी दुष्काळ आणि आता सततचा पाऊस त्यामुळे पिके गेली. अशा परिस्थितीत जीवनाला कंटाळून (ता. ) येथील (वय ३६) यांनी गळफास लावून घेत आत्महत्या केली. या घटनेपूर्वी काही काळ आधीच पारनेरच्या तहसीलदार याच गावात पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी येऊन गेल्या होत्या. आग्रे यांचा त्यांच्याशी संवाद झाला असता तर कदाचित त्यांचा जीव वाचला असता, अशी आता ग्रामस्थांमध्ये चर्चा आहे. ( Latest Updates )

वाचा:

राजू आग्रे गावच्या ग्रामपंचायतीत शिपाई म्हणून नोकरीला होते. करोना संसर्गामुळे ग्रामपंचायतीची आर्थिक स्थिती खालावली आहे. त्यामुळे गेल्या काही काळापासून आग्रे यांना पगार मिळाला नव्हता. त्यांच्या वडिलांची शेती आहे. मात्र, यापूर्वी सतत दुष्काळामुळे शेतीत फारसे उत्पन्न होत नव्हते. नोकरी हाच त्यांच्यासाठी आधार होता. पगार बंद झाल्याने शेतीवरच त्यांची भिस्त होती. सध्या पिकेही घेतली होती. मात्र, सततच्या पावसामुळे शेतीचेही नुकसान झाले. ना नोकरीची, ना शेतीच्या उत्पन्नाची हमी, अशा दुहेरी संकटात आग्रे अडकल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

वाचा:

पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे आज सकाळी याच गावात पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी गेल्या होत्या. त्यांचा दौरा आटोपल्यानंतर आग्रे यांच्या आत्महत्येची माहिती मिळाली. आग्रे यांच्यावर कर्जही असल्याचे सांगण्यात आले. पावसामुळे नुकसान झाले असले तरी सध्या मंत्री आणि अधिकारीही गावागावात जाऊन पाहणी करीत आहेत, पंचनामे करण्याचेही काम सुरू आहे. मात्र, आग्रे यांनी या यंत्रणेसमोर आपली व्यथा मांडण्याऐवजी जीवन संपविण्याचा मार्ग का पत्करला, असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे.

वाचा:

घटनेची माहिती मिळाल्यावर पारनेर पोलिसांनी गावात जाऊन मृतदेह ताब्यात घेतला. सरकारी रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. सायंकाळी शोकाकुल वातावरणात राजू यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. राजू यांनी आपल्या ग्रामपंचायतीतील थकलेल्या पगाराची व्यथा आणि शेतीच्या नुकसानाची समस्या गावात आलेल्या तहसीलदारांपुढे मांडली असती तर किमान चर्चेतून दिलासा मिळाला असता आणि त्यांचा जीव वाचला असता अशी चर्चा गावात होती.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here