म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

सोशल मीडियावरील आक्षेपार्ह वक्तव्यांमुळे देशद्रोहाचा गुन्हा नोंद झालेली अभिनेत्री कंगना रणोट हिच्या आणखी एका ट्वीटविरोधात दंडाधिकारी न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. कंगनाने आक्षेपार्ह ट्वीटद्वारे न्यायव्यवस्थेचाही अवमान केला, असा आरोप करत अॅड. अली काशिफ खान देशमुख यांनी अंधेरी न्यायदंडाधिकारी न्यायालयात फौजदारी तक्रार दाखल केली आहे.

हिंदू व मुस्लिम या दोन समुदायांमध्ये परस्परांविषयी द्वेष निर्माण होईल आणि समाजातील सौहार्दपूर्ण वातावरण व जातीय सलोखा बिघडेल, अशा हेतूने सोशल मीडियावर वारंवार विधाने केल्याच्या आरोपांविषयी वांद्रे पोलिसांनी वांद्रे दंडाधिकारी न्यायालयाच्या आदेशानुसार यापूर्वीच कंगना व तिची बहीण यांच्याविरोधात एफआयआर नोंदवला आहे. पोलिसांनी या एफआयआरमध्ये भारतीय दंड संहितेच्या १२४-अ (देशद्रोह) या कलमाबरोबरच १५३-अ (धार्मिक व जातीय सलोखा बिघडवणे) व २९५-अ (धार्मिक भावनांना ठेच पोचवणे) या कलमांखाली गुन्हा नोंदवला आहे.

‘या एफआयआरनंतर कंगनाने आणखी एक ट्वीट करून ‘पप्पू सेना’ वगैरे शब्द वापरून न्यायालयाचाही अवमान केला. तिला न्यायालयाचाही आदर नाही’, असा आरोप अली यांनी तक्रारीत केला आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here