ठाणे: बिहारमध्ये सत्ता मिळाल्यास सर्वांना करोनाची लस मोफत दिली जाईल, अशी घोषणा करणाऱ्या भारतीय जनता पक्षाला विरोधकांनी घेरले आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भाजपवर तोफ डागली आहे. राज्याचे गृहनिर्माण मंत्री यांनी ट्वीट करून भाजपच्या आश्वासनाचा पंचनामा केला आहे. ( for Bihar Election)

बिहार निवडणुकीमुळं सध्या देशभरातील वातावरण तापलं आहे. बिहारमधील सत्ता टिकवण्यासाठी भाजप व नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दलाची आघाडी जोरदार प्रयत्न करत आहे. त्याचवेळी तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय जनता दलही जोमाने मैदानात उतरला आहे. अन्य पक्षही आपापल्या परीनं प्रयत्न करत आहेत. मतदारांवर आश्वासनांची खैरात केली जात आहे. या पार्श्वभूमीवर भाजपनं काल पक्षाचा निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध केला. बिहारमध्ये भाजपची सत्ता आल्यास करोनाची लस मोफत देऊ, असं आश्वासन त्यात देण्यात आलं आहे. त्यावरून गदारोळ उठला आहे. भाजप करोनाच्या महासाथीचंही राजकारण करत असल्याचा आरोप होत आहे.

वाचा:

काँग्रेसचे नेते, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी भाजपवर घणाघाती टीका केली आहे. ‘निवडणुकीच्या प्रचारामध्ये मतं मागण्यासाठी आम्ही तुम्हांला कोरोनाची लस फुकट देऊ हे सांगणं म्हणजे माणुसकिची नीचोत्तम पातळी गाठण्यासारखं आहे. नि:स्वार्थपणे लोकांच्या जीवाची रक्षा करणे ही सरकारची प्राथमिक जबाबदारी आहे. त्यासाठी मतं मागणं हा माझ्या अंदाजाने आचारसंहितेचाही भंग आहे,’ असं आव्हाड यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

‘समजा, बिहारी जनतेने भाजपला सत्ता दिली नाही तर बिहारला करोनाची लस मिळणार नाही का? असा प्रश्नही त्यांनी केला आहे. हा अमानुषपणा आहे. खरंतर, निवडणूक असो किंवा नसो, संपूर्ण देशाला लस मिळेल असं त्यांनी म्हटलं पाहिजे. अन्यथा महाराष्ट्राला करोनाच्या लसीसाठी चार वर्षे वाट पाहावी लागेल,’ अशी भीती आव्हाड यांनी वर्तवली आहे.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here