म. टा. प्रतिनिधी, : दगडाने डोके ठेचून गुंडाची करण्यात आली. ही घटना कपिलनगरमधील येथे गुरुवारी सायंकाळी उघडकीस आली. उपराजधानीत हत्येचे सत्र सुरू असल्याचे या घटनेवरून अधोरेखित झाले आहे.

शैलेश बालाजी देशभ्रत्तार (३४, रा. आवळेनगर) असे मृतकाचे नाव आहे. कपिलनगर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून मारेकरी राकेश मोतीलाल पटेल (वय ३२, रा. मानवनगर) याला अटक केली. शैलेशविरुद्ध हत्या, मारहाणीसह अनेक गुन्हे दाखल आहेत. तो परिसरातील नागरिकांना नेहमी त्रास द्यायचा. राकेशसोबत ओळख असल्याने गुरुवारी दुपारी शैलेश व राकेशने आवळेनगरमध्ये दारू प्यायली. याचदरम्यान शैलेशने राकेशला शिवीगाळ करून मारहाण केली. तो राकेशला ठार मारण्याची धमकी द्यायला लागला. शैलेश ठार मारेल, अशी भीती राकेशला वाटली. दरम्यान, अतिमद्यसेवनाने शैलेश मोकळ्या जागेत झोपला. राकेशने दगडाने डोके ठेचून त्याचा केला व पसार झाला. घटनेची माहिती मिळताच कपिलनगर पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. पंचनामा करून पोलिसांनी मृतदेह मेयो हॉस्पिटलकडे रवाना केला. खुनाचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी राकेशला अटक केली.

पोलीस अकार्यक्षम?

कपिलनगरमध्ये गुन्हेगार सक्रिय झाले असून ते नागरिकांना त्रास देत आहेत. पोलिसांकडे तक्रार केल्यास पोलिस काहीच कारवाई करीत नाहीत. त्यामुळेच तीन दिवसांपूर्वी तरुणीची छेड काढल्याने तडीपार गुंड दीपक ऊर्फ गोलू राजपूत याची हत्या करण्यात आली. पोलिसांच्या अकार्यक्षमतेमुळेच कपिलनगरमध्ये गुन्हेगारांचे चांगलेच फावत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here