मुंबई: क्लिनिकमध्ये आलेल्या रुग्ण महिलेचा केल्याच्या आरोपाखाली ७८ वर्षीय डॉक्टरला अटक करण्यात आली. रुग्ण महिला डॉक्टरच्या क्लिनिकमध्ये आली होती. डॉक्टरने तिचे चुंबन घेतले आणि तिचा विनयभंग केला, असा आरोप आहे. या प्रकरणी गावदेवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉक्टरला न्यायालयात हजर केले असता, त्याची जामिनावर सुटका करण्यात आली.

पोलिसांनी सांगितले की, पीडित महिलेने शुक्रवारी तक्रार केली. कपाळावर अॅलर्जी झाल्याने महिला ऑगस्टमध्ये क्लिनिकमध्ये गेली होती. त्यावेळीही डॉक्टरने विनयभंग केला. त्यावेळी औषधे दिली आणि पुन्हा दोन आठवड्यानंतर येण्यास सांगितले. पुढच्या वेळी ती पुन्हा क्लिनिकमध्ये गेली. त्यावेळीही त्याने स्पर्श करून विनयभंग केला. शुक्रवारी महिला पुन्हा क्लिनिकमध्ये गेली. तिच्यासोबत तिची दोन मुले होती. त्यापैकी एक मुलगा क्लिनिकमध्ये तिच्यासोबत गेला. तर दुसरा मुलगा कारमध्ये बसला होता. क्लिनिकमध्ये गेल्यावर त्याने महिलेला स्पर्श केला. त्यानंतर तिचे चुंबन घेतले, असे तक्रारीत म्हटले आहे.

महिलेने पोलिसांना सांगितले की, या प्रकारानंतर तिने डॉक्टरला धक्का देऊन बाजूला केले आणि क्लिनिकमधून बाहेर पडली. घरी गेल्यानंतर सगळा प्रकार पतीला सांगितला. त्यानंतर पोलिसांत जाऊन संबंधित डॉक्टरविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपी डॉक्टरला अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याची जामिनावर सुटका केली. २०१५ मध्येही आरोपी डॉक्टरला अशाच प्रकारच्या गुन्ह्यात एलटी मार्ग पोलिसांनी अटक केली होती.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here