उल्हासनगर: जिल्ह्यातील उल्हासनगरमध्ये एका ४० वर्षीय बांधकाम व्यावसायिकावर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. बुधवारी रात्री ही घटना घडल्याची माहिती पोलिसांनी दिली.

संदीप गायकवाड असे बांधकाम व्यावसायिकाचे नाव असून, हार्डवेअरचाही व्यवसाय आहे. बुधवारी रात्री साडेअकराच्या सुमारास ते मित्रांसोबत गप्पा मारत होते. त्याचवेळी एक कार आली. कारमध्ये बसलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला. मात्र, खाली झुकल्याने त्यातून ते बचावले, अशी माहिती पोलिसांनी दिली.

गायकवाड यांच्यावर कारमधील व्यक्तींनी लोखंडी सळ्यांनी प्रहार केले. या हल्ल्यात ते जखमी झाले. पोलिसांची व्हॅन वेळीच परिसरात आल्याने हल्लेखोर तेथून पसार झाले. पोलिसांनी हल्लेखोरांचा पाठलाग केला. मात्र, ते पळून जाण्यात यशस्वी झाले. या प्रकरणी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या हल्ल्यात जखमी झालेल्या गायकवाड यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे. हल्लेखोरांना पकडण्यासाठी पोलिसांचे पथक तयार करण्यात आले असून, या हल्ल्याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here