मुंबई: मुंबईकरांना खूप मोठा दिलासा देणारी बातमी राज्य सरकारने दिली आहे. मुंबईतील दळणवळणाचे मुख्य साधन असलेल्या मधून आता पूर्ण क्षमतेने प्रवासी वाहतूक करण्यास सरकारने परवानगी दिली आहे. ( Latest Updates )

बेस्ट बसमधून पूर्ण क्षमतेने प्रवासी वाहतूक करण्यासाठी मंजुरी मिळावी अशी मागणी करणारे पत्र बेस्ट महाव्यवस्थापकांनी राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव यांना लिहिले होते. १८ सप्टेंबर रोजीच्या या पत्रावर अखेर आज निर्णय कळवण्यात आला असून बेस्टला पूर्ण क्षमतेने प्रवासी वाहतूक करण्यास हिरवा कंदील दिला गेला आहे. राज्य सरकारने बेस्टला परवानगी देताना करोन संसर्गाच्या अनुषंगाने काही बंधने घातली आहेत.

‘या’ असतील अटी…
– बेस्ट उपक्रमाच्या बसेसमध्ये प्रवास करताना प्रवाशांना मास्क आणि सॅनिटायझरचा वापर बंधनकारक करावे.

– बसेसचा निर्जंतुकीकरण नियमितपणे करावे.

– संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने वेळोवेळी घालून दिलेल्या इतर अटींचे पालन करावे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here