म. टा. प्रतिनिधी, : कामाचे १२ हजार रुपये न दिल्याने प्लंबरने कंत्राटदाराची केल्याची घटना ठाण्यातील भागात घडली. हत्येनंतर परराज्यात पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने आरोपीला २८ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सूरज सरोज (२३) असे या आरोपीचे नाव असून तो वागळे इस्टेटमधील इंदिरानगरमध्ये राहतो.

लॉकडाउनमध्ये काम नसल्याने सूरज हा दूरचा नातेवाइक असेलला प्लंबिंग कंत्राटदर विजय राम उजागीर सरोज (३८) याच्याकडे काम करत होता. कामाचे जवळपास १२ हजार रुपये झाले होते. मात्र विजयने पैसे दिले नव्हते. तसेच प्लंबिंग कामासाठी लागणारे साहित्यही ठेऊन घेतले होते. याच रागातून सूरजने विजयच्या डोक्यावर पान्ह्याने अनेक घाव घालून त्याचे डोके फोडले. गंभीर जखमी झालेल्या विजयचा मृत्यू झाला.

हत्येचा ही घटना गुरुवारी घोडबंदर रोडवरील आनंदनगरमध्ये घडली. या प्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सूरज परराज्यात पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर खैरनार यांना मिळाली होती. या माहितीनंतर सहायक पोलीस निरीक्षक सागर जाधव, पोलीस उपनिरीक्षक रुपाली रत्ने, हवालदार खरात, पाटील, तायडे, महापुरे यांच्या पथकाने आरोपीच्या मुसक्या आवळल्या. पोलिसांनी आरोपीकडून पान्हा जप्त केला आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here