म. टा. प्रतिनिधी, : ई-कॉमर्स कंपनीतून बोलत असल्याचे सांगून गिफ्ट देण्याचे प्रलोभन दाखवून एका डॉक्टरची १ लाख ०७ हजार रुपयांची केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत डॉ. रॉबीन प्रमोद चौधरी (वय ३३, रा.वानवडी, मूळ बिहार) यांनी तक्रार दिली आहे. रॉबीन चौधरी हे कमांड हॉस्पिटलमध्ये डॉक्‍टर म्हणून कार्यरत होते. १४ ऑक्‍टोबर रोजी ‘अॅमेझॉन’वरून त्यांनी खरेदी केली. त्यानंतर ऑनलाइन खरेदी करत असताना त्यांना लिंकवर एक जाहिरात दिसली. त्यावर त्यांनी क्‍लिक केले असता, त्यांना समोरील एका व्यक्तीचा कॉल आला. त्याने तुम्ही अॅमेझॉनवर ज्या वस्तू खरेदी करत आहात, त्यावर तुम्हाला थेट २० टक्के सवलत देण्यात येईल. ही सवलत अॅमेझॉनचे कमिशन वगळले गेली असल्याने मिळणार आहे. तसेच, खरेदीवर एक आकर्षक गिफ्टही मिळेल, असे प्रलोभन दाखवले. यामुळे त्यांनी अॅमेझॉनवर खरेदी केलेल्या ३३ हजारांच्या वस्तू त्याच्याकडून खरेदी केल्या. यासाठी त्याला ऑनलाइन पद्धतीने ३३ हजार रुपये वर्ग केले. यानंतर समोरील व्यक्तीने कॉल करुन पैसे मिळाले नाहीत, पुन्हा वर्ग करा म्हणत पुन्हा ३३ हजार देण्यास भाग पाडले. यानंतर त्यांना ३३ हजार बिल झाले असून, ते पाठविण्यास सांगत त्यांच्याकडून पुन्हा पैसे घेतले.

तीन वेळा पैसे पाठवल्यानंतर रॉबीन यांनी अगोदर दिलेले ६६ हजार रुपये रिफंड करण्यास सांगितले. यावर समोरील व्यक्तीने तुमच्या पत्नीचे बॅंक खाते असेल तर, त्याची माहिती पाठवा. त्यावर रिफंड पाठवतो असे सांगितले. रॉबिन यांनी त्याप्रमाणे पत्नीचे बॅंक डिटेल्स पाठवले. पुन्हा समोरील व्यक्तीने खात्यात किती पैसे आहेत, असे विचारल्यावर रॉबिन यांनी १३ हजार रुपये असल्याचे सांगितले. यानंतर त्यांने रॉबिन यांना फोनवर आलेल्या ओटीपी विचारला. ओटीपी मिळताच त्याने रॉबिन यांच्या पत्नीच्या खात्यातीलही १३ हजार रुपये काढून घेतले. आरोपीने त्यांना वेगवेगळ्या चार ते पाच बँक खात्यात ही रक्कम ऑनलाइन पध्दतीने वर्ग करण्यास भाग पाडल्याचे समोर आले आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक सलीम चाऊस करत आहेत.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here