म. टा. प्रतिनिधी, : मार्गावर कळंबे तर्फ कळे येथे बस आणि कारची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात कारमधील तिघे जागीच ठार झाले, तर चौघे गंभीर जखमी आहेत. जखमींना उपचारासाठी कोल्हापुरातील सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले आहे. हा भीषण शुक्रवारी सकाळी दहाच्या सुमारास घडला.

करण दीपक माळवे (वय २७), संजय दिनकर माळवे (४४), आक्काताई दिनकर माळवे (६५, सर्व रा. विक्रमनगर, कोल्हापूर) अशी मृतांची नावे आहेत. गगनबावडा येथील एका नातेवाइकाचे निधन झाल्यामुळे विक्रमनगर येथील माळवे कुटुंबीय अंत्यविधीसाठी कारमधून गगनबावड्याला निघाले होते. कारमध्ये एका लहान मुलासह सात जण होते. कळे येथे समोरच्या वाहनाला ओव्हरटेक करताना समोरून आलेल्या बसला धडकली. कणकवली डेपोची बस कणकवलीहून कोल्हापूरला निघाली होती. ही धडक एवढी भीषण होती की, कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर उर्वरित चौघे गंभीर जखमी झाले.

अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी जखमींना उपचारासाठी कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात दाखल केले, तर कळे पोलिसांनी अपघाताचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सीपीआरमध्ये पाठवले. जखमींपैकी लहान मुलाची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तिघांचा अपघाती मृत्यू झाला, तर चौघे जखमी असल्याने माळवे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. जखमींना सीपीआरमध्ये दाखल केल्यानंतर नातेवाईकांनी सीपीआरमध्ये गर्दी केली.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here