पिंपरी-चिंचवड संविधान बचाव समितीच्यावतीने पिंपरीत सीएए-एनआरसी-एनपीआरला विरोध दर्शविण्यासाठी महासभेचे शुक्रवारी (१७ जानेवारी) आयोजन केले होते. यावेळी खलिद बोलत होता. यावेळी सभेचे अध्यक्ष मानव कांबळे, सुप्रिम कोर्टातील वकिल अॅड. अविक सहा, मारुती भापकर, अखिल मुजावर, प्रताप गुरव, सुरेश बेरी, माधव आव्हाड यांच्यासह सुमारे पाच हजार नागरिक उपस्थित होते.
तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांनी कधीही धर्मात भेदभाव केला नाही. महाराज धर्मनिरपेक्ष होते. त्यांच्या सैन्यात मुस्लिम देखील होते असे सांगत शहीद हेमंत करकरे यांना भारतरत्न देण्याची मागणीही त्याने केली. नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए), राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) आणि एनपीआर हे तीनही कायदे मागे घेण्याची मागणी यावेळी करण्यात आली. या कायद्यांसर्भात कोर्टाचा निकाल २२ जानेवारीला येणार आहे. शहराच्या विविध भागात तोपर्यंत शांततेत आंदोलन करण्यात येणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले.
उमर पुढे म्हणाला, २०१४ च्या पूर्वी एक घोषणा दिली जात होती. देखो-देखो कोन आया है, गुजरात का शेर आया है. पण आम्हाला शेर नको होता, कारण आम्हाला माणूस हवा होता. माणसाकडे डोक्यासह हृदय असते. यांच्याकडे हृदय असतं तर त्यांनी हा कायदा आणला नसता. आपल्या देशात कागदावर नागरिकत्व ठरवलं जातय. पण गुजरातच्या शेरला शिक्षणाचे कागद मागितले, तर हा शेरचं मांजर होतं. महाराष्ट्र पोलिसांना माझा सलाम, त्यांनी एक आदर्श उभं केलाय. तुम्ही केलेल्या सहकार्याने राज्यात मुस्लिम बांधव रस्त्यावर उतरून निदर्शन करू शकला.
शेतकऱ्यांचे प्रश्न आणि गरिबी यावरून नागरिकांचे लक्ष विचलित करण्यासाठी देशात हिंसा पसरविली जात आहे. संसदेत भाजपचे बहूमत आहे. त्याचा त्यांना अहंकार आहे. परंतु, जनता रस्त्यावर बहूमत सिद्ध करेल. शांततेच्या मार्गाने आंदोलन करणार आहोत. कोणतीही अहिंसा होऊ दिली जाणार नाही. भविष्य वाचविण्यासाठी लढाई लढत आहोत.
रोहित वेमुलाची आत्महत्या नव्हती. त्याचा खून केला होता. त्याचे विचार मारले नाहीत. रोहित आमच्यामध्ये जिवंत आहे. मै शेर नही हू इन्सान हू और इन्सान सोचता समझता है, गुजरात का शेर ना सोचता है ना समझता है, असेही तो म्हणाला.
सावकरांऐवजी शहिद करकरे भारतरत्न द्या
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पोलिसांचा सन्मान करायच तर सावकरांऐवजी शहिद हेमंत करकरे यांना भारतरत्न द्यावे. शहिद करकरे यांचा अपमान या भाजपमधील लोक करीत आहेत. त्यामुळे त्यांचा सन्मान करायचा असेल तर खरे भारतरत्न त्यांनी करकरे यांना दिले पाहिजे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times