ओबामा यांच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळामध्ये बायडन हे उपाध्यक्ष होते. बायडन व डेमोक्रॅटिक पक्षाच्या उपाध्यक्षपदाच्या उमेदवार कमला हॅरिस यांच्या प्रचारामध्ये ओबामा बुधवारी प्रथमच उतरले. बायडन व हॅरिस यांच्याकडे अर्थव्यवस्था आणि करोना साथरोगाचा अटकाव यांविषयी योजना असल्याचे ओबामा यांनी या वेळी सांगितले. फिलाडेल्फिया येथे भाषण करताना ओबामा यांनी आपल्याला आणखी चार वर्षे सध्याचे सरकार परवडणारे नाही, असे विधान करून ट्रम्प यांच्या सरकारवर निशाणा साधला.
वाचा:
‘ट्विट करून प्रश्न सुटत नाहीत. गोष्टींचे गैरव्यवस्थापन करून प्रश्न सुटत नाहीत. त्यासाठी तुमच्याकडे योजना असाव्या लागतात. डोनाल्ड ट्रम्प हे आपल्याला वाचवणार नाहीत. त्यांनी स्वत:ला वाचवण्यासाठीही प्राथमिक पावले उचलली नाहीत. त्यांनी करोनाच्या संपूर्ण काळामध्ये काम केले असते, तर अमेरिकेतील परिस्थिती इतकी वाईट नसती,’ अशी पुस्तीही ओबामा यांनी जोडली.
वाचा:
वाचा:
दरम्यान, ‘मी पुन्हा निवडून आल्यास अमेरिकी नागरिकांना आशावाद आणि संधी देईन,’ असे आश्वासन रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्षपदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले. डेमोक्रॅटिक पक्षाचे जो बायडन अध्यक्षपदी निवडून आल्यास ते केवळ निराशावाद आणि गरिबी देतील, असेही ट्रम्प म्हणाले. बायडन यांची मागील ४७ वर्षांची कारकीर्द पाहा आणि त्या तुलनेत मागील ४७ महिन्यांतील माझी कामगिरी पाहून मतदानाचा निर्णय घ्या, असे ट्रम्प यांनी मतदारांना उद्देशून सांगितले. मागील ४७ वर्षांपासून बायडन तुमच्या नोकऱ्या बाहेरील देशांमध्ये पाठवत असून तुमच्या देशाच्या सीमा परदेशी नागरिकांसाठी उघडत आहेत, असा आरोपही ट्रम्प यांनी केला. मी पुन्हा निवडून आल्यास पुढील वर्ष हे आर्थिकदृष्ट्या अमेरिकेच्या इतिहासातील सर्वोत्तम वर्ष असेल, असेही ते म्हणाले. अमेरिकन अध्यक्षपदासाठी ३ नोव्हेंबर रोजी निवडणूक होत आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times