मुंबई: दलात असंतोष असून, पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचे आदेश कुणीही पाळत नाही, असे वृत्त प्रसारित केल्याप्रकरणी रिपब्लिक टीव्हीच्या अँकरसह सहा जणांविरोधात ना. म. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. टीआरपी घोटाळ्याचा आरोपांनंतर आता कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल झाल्याने संबंधित वृत्तवाहिनीच्या अडचणीत आणखीनच भर पडली आहे.

मुंबईतील ना. म. जोशी मार्ग पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक शशिकांत पवार यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी रिपब्लिक टीव्हीच्या संपादकीय विभागातील कर्मचाऱ्यांविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. त्यात डेप्युटी न्यूज एडिटर सागरिका मित्रा, अँकर आणि सिनिअर असोसिएट एडिटर शिवानी गुप्ता, डेप्युटी एडिटर शावन सेन, एक्झिक्युटिव्ह एडिटर निरंजन नारायणस्वामी आणि संपादकीय विभागातील इतर कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here