नवी दिल्ली : दुर्गापूजेचं आकर्षण म्हणजे शानदार मंडप आणि वेगवेगळया रुपातल्या मूर्त्यांद्वारे दिले जाणारे संदेश… मूर्शिदाबादच्या एका मंडपात घडवल्या गेलेल्या मूर्त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेले दिसत आहेत. या मंडपात असुराच्या रुपात दिसत आहेत. जिनपिंग या मंडपात महिषासुराच्या रुपात दिसत आहेत. तर दुर्गामातेनं शी जिनपिंग यांचा शिरच्छेद करत संहार केल्याचं दृश्य या दुर्गापूजेच्या मंडपात दिसत आहे.

विशेषत: बंगालमध्ये खूपच प्रसिद्ध आहे. दरवर्षी नवरात्रीत पश्चिम बंगालच्या दुर्गापूजेसाठी वेगवेगळ्या रचनात्मक विचारांसह अनेक मूर्त्या स्थापन केल्या जातात. यंदादेखील नवरात्र सुरू होण्याआधीच श्रमिक मजूर महिलेच्या मूर्तीनं अनेकांचं लक्ष वेधून घेतलं होतं. करोना व्हायरसचा अंत करणारी दुर्गामाताही अनेक ठिकाणी दिसून येतेय. परंतु, मुर्शिदाबादमध्ये मात्र चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांचा शिरच्छेद करणारी माता चर्चेचा विषय ठरलीय.

बंगालच्या एका स्थानिक वर्तमानपत्रानं दिलेल्या बातमीनुसार, ही मूर्ती मुर्शिदाबादच्या बेहरमपूरमध्ये उभारण्यात आलीय. मूर्तीकार असीम पाल यांनी मंडपात दुर्गामातेच्या मूर्तीशिवाय लक्ष्मी, सरस्वती, गणेश आणि कार्तिक यांच्याही मूर्त्या ठेवल्या आहेत. दुर्गामाता सिंहावर विराजमान आहे. तिच्यासमोर असूराचं धड पडलंय आणि धडाजळच रक्तबंबाळ अवस्थेतलं एक कापलेलं शीर पडलंय, हे शीर जिनपिंग यांच्या चेहऱ्याची प्रतिकृती आहे.

वाचा :

वाचा :

शशी थरुर यांनी साधला डाव्यांवर निशाणा
काँग्रेस नेते यांनीदेखील हा व्हायरल फोटो शेअर करताना बंगाली लोकांना टोमणा हाणलाय. ‘मला वाटतं की बंगाली आपल्या कूटनीतीसाठी ओळखले जातात. ‘चीनचा अध्यक्ष आमचा अध्यक्ष’ हे दिवस अधिकृतरित्या संपुष्टात आलेत हे स्पष्ट दिसतंय’, असं म्हणत डाव्या पक्षांवर शशी थरुर यांनी निशाणा साधला. डावे पक्ष चीनचे संस्थापक माओ यांचा आदर्श मानतात.

मात्र, शशी थरूर यांच्या या ट्विटनं अनेक बंगाली लोकांना नाराजही केलंय. जिनपिंग यांना या रुपात दाखवल्यानं थरुर यांना का त्रास होतोय? असाही प्रश्न काहींनी विचारलाय.

उल्लेखनीय म्हणजे, पूर्व लडाखमध्ये तसंच अरुणाचल प्रदेशच्या सीमेवर भारत – चीन दरम्यान तणावाची स्थिती दिसून येतेय.

वाचा :

वाचा :

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here