मुंबई: ‘ यांना राष्ट्रवादीत लिमलेटची गोळी देतात की कॅडबरी मिळते ते लवकरच दिसेल’, असा टोला लगावत प्रदेशाध्यक्ष यांनी खडसे यांच्यावर टीकेचा पहिला वार केला आहे. ( President Slams )

वाचा:

एकनाथ खडसे यांनी भाजपचा राजीनामा देण्याची घोषणा केल्यानंतर भाजपमधून अत्यंत सावध प्रतिक्रिया व्यक्त झाल्या होत्या. खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले. फडणवीसांच्या छळाला कंटाळून मी पक्ष सोडत आहे, असे खडसे म्हणाले. त्यावर केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे वगळता कुणीही तीरकस प्रतिक्रिया दिली नाही. कुणाच्या जाण्याने पक्ष थांबत नाही, असे फडणवीस म्हणाले तर चंद्रकांत पाटील यांनी दानवे यांना शुभेच्छा देत अधिक भाष्य टाळले. आता मात्र खडसे यांच्या काँग्रेसमधील प्रवेशानंतर पाटील यांनी टीकेचा पहिला वार केला आहे. खडसे यांची राष्ट्रवादीत कशाप्रकारे बोळवण केली गेली आहे, याचा पाटील यांनी समाचार घेतला.

वाचा:

भाजपमध्ये माझ्यावर अन्याय झाला असे खडसे आजही म्हणत आहेत. मला विचाराल तर त्यातून नक्कीच मार्ग निघाला असता. मी त्यांच्याशी बोललोही होतो. पक्ष सोडू नका असे मी त्यांना सांगितले होते, असे नमूद करत राष्ट्रवादी आता खडसेंना काय देते ते पाहूया, असा खोचक सवालच पाटील यांनी केला. खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशासाठी दुपारी दोनची वेळ ठरली होती. मात्र, दोन वाजता कार्यक्रम सुरू झाला नाही. त्याला उशीर का झाला, हे त्यांनाच माहीत. खडसे यांना काय द्यायचं हे अजून ठरलं नाही बहुतेक! ‘तुमचं समाधान होईल असं देऊ’ इतकंच आश्वासन खडसे यांना मिळालं आहे, असे सांगत पाटील यांनी टोलेबाजी केली.

समाधान मानायचे असेल तर लिमलेटच्या गोळीनेही होते, पण त्याने तुमचे समधान व्हायला हवे ना, असे सांगताना खडसे यांना लिमलेटची गोळी मिळते की कॅडबरी मिळते ते लवकरच कळेल. त्याने खडसे समाधानी होणार की ‘आता काही पर्याय नाही’ म्हणून पुढे जाणार हे पाहावे लागेल, असेही पाटील पुढे म्हणाले.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here