शिलाँग : काही दिवसांपूर्वी आणि मेघालयाच्या रहिवाशांमध्ये तसंच सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये उफाळून आल्याचं दिसलं. सीमावादावरून स्थानिकांत तुंबळ हाणामारीही घडून आली. दीर्घकाळापासून सुरू असलेला हा वाद सोडवण्यासाठी शुक्रवार मेघालयाच्या भाजप आमदारांनी केंद्राकडे हा वाद सोडवण्यासाठी साकडं घातलंय. भाजपचे आमदार () यांनी एक पत्र पत्र केंद्रीय गृहमंत्री () यांना लिहिलंय. या पत्राद्वारे त्यांनी केंद्राकडे सीमावाद सोडवण्याची याचिका केलीय. ( And Border Dispute)

मेघालयात भाजपनं कोनराडच्या संगमा यांच्या ‘ लोकशाही आघाडी’ सरकारला पाठिंबा दिलाय. याच सरकारात सहभागी असलेल्या आमदार शुल्लई यांनी शहा यांना लिहिलेल्या पत्रात, ‘आसाम आणि मेघालय यांच्यातील दीर्घकाळ प्रलंबित वाद मिटविण्यासाठी केंद्र सरकारनं हस्तक्षेप करावा. २०२१ पर्यंत ईशान्येकडील राज्यांदरम्यान असलेला सीमा वाद मिटवण्याच्या निर्णय स्वागतार्ह आहे. आम्ही त्याबद्दल खूप आभारी आहोत’ असं म्हटलंय.

वाचा : वाचा :

‘आसाम आणि मेघालय या दोन राज्यांदरम्यान असे अनेक भूभाग आहेत जिथे अनेकदा सीमावाद समोर येतो. यामुळे सीमेच्या दोन्ही बाजूंच्या लोकांमध्ये तणावपूर्ण शांतता आणि शत्रुत्व कायम राहतं’ असंही शुल्लई यांनी आपल्या पत्रात नमूद केलंय.

आसाम आणि मेघालय दरम्यान जवळपास १२ ठिकाणी सीमेवर वाद आहे. या वादावर तात्पुरता तोडगा म्हणून दोन्ही राज्यांनी एक धोरणही स्वीकारलेलं आहे, ज्यानुसार एक राज्य दुसर्‍या राज्यास माहिती न देता विकासाशी संबंधित कोणतीही कामं करणार नाही.

वाचा : वाचा :

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here