नवी दिल्ली : ‘जम्मू काश्मीरमध्ये पुन्हा लागू होईपर्यंत ना निवडणूक लढवणार, ना तिरंगा हातात घेणार’ असं म्हणत यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारचा विरोध केलाय. अनेक जण महबूबा मुफ्ती यांचं विधान योग्य-अयोग्य याविषयी चर्चा करत आहेत. अशा वेळी काँग्रेसनं मात्र वेगळा आणि अतिशय महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते यांनी मुफ्ती यांच्या वक्तव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करतानाच या वक्तव्याच्या ठराविक वेळेवरही प्रश्न विचारलाय. महबूबा मुफ्तींच्या सुटकेसाठी बिहार निवडणुकीची वेळ का साधली? असा सवालही काँग्रेसकडून उपस्थित करण्यात आला आहे.

‘महबूबा मुफ्ती या कुणासोबत सत्तेत होत्या? त्यांना बिहार निवडणुकी दरम्यान का सोडण्यात आलं? हा केवळ एक दिखावा आहे, कारण भाजप या निवडणुकीत बिहार सोडून इतर सर्व मुद्यांवर बोलणार आहे’ अशी टीकाही सुरजेवाला यांनी केलीय. महबूबा मुफ्ती यांनी नेहमीच पाकिस्तानचे आभार मानलेत, असंही सुरजेवाला यांनी म्हटलंय.

वाचा : वाचा :

मोदींनी बिहारमध्ये उचलला अनुच्छेद ३७० चा मुद्दा

उल्लेखनीय म्हणजे, शुक्रवारी यांनी दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या एका सभेला संबोधताना काश्मीरमधील अनुच्छेद ३७० हटवण्याचा मुद्दा उचलून धरला. बिहार निवडणुकीत या मुद्यावर त्यांनी मतंही मागितली. त्यानंतर थोड्याच वेळात काश्मीरमध्ये अनुच्छेद ३७० लागू करण्याविरोधात आघाडी करणाऱ्या नेत्या आणि जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती यांनी नरेंद्र मोदी यांना आव्हान दिलंय. जोपर्यंत काश्मीरमध्ये अनुच्छेद ३७० परत लागू केला जाणार नाही तेव्हापर्यंत आपण ना निवडणूक लढवणार, ना तिरंगा हातात घेणार, अशी घोषणाच मेहबूबा मुफ्ती यांनी केलीय. ‘तिरंग्याशी आमचं नातं वेगळं नाही. जेव्हा आमच्या हातात हा झेंडा येईल, तेव्हा आम्ही तिरंगाही हातात घेऊ’ असं यावेळी महबूबा मुफ्ती यांनी जम्मू-काश्मीरच्या झेंड्याकडे इशारा करत म्हटलं.

वाचा : वाचा :

भाजपशी हातमिळवणीचा महबूबांना पश्चाताप

भारतीय जनता पक्षासोबत हातमिळवणी करण्याविषयीही त्यांनी यावेळी भाष्य केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास करण्याचा आपल्याला पश्चाताप होत असल्याचं महबूबा मुफ्ती यांनी म्हटलं. भाजप असा पक्ष आहे, ज्याचा एक भाग अटल बिहारी वाजपेयीदेखील होते. आता मात्र बिहारमध्ये मतं मिळवण्यासाठी त्यांना अनुच्छेद ३७० च्या मुद्याची मदत घ्यावी लागतेय. जेव्हाही त्यांना अपयश समोर दिसतं तेव्हा ते काश्मीर आणि अनुच्छेद ३७० सारखे मुद्दे समोर आणतात. वास्तविक मुद्यांवर मात्र बोलण्याची त्यांची इच्छा नाही, असं म्हणत मुफ्ती यांनी भाजपवर टीका केलीय. १४ महिने नजरकैदेत राहिल्यानंतर सुटका झालेल्या मुफ्ती यांनी शुक्रवारी पहिल्यांदाच आपल्या घरी एक पत्रकार परिषद घेतली.

मेहबूबा मुफ्तींना भाजपचा सल्ला

दरम्यान, उत्तर प्रदेश सरकारमधील अल्पसंख्यांक कल्याण मंत्री मोहसिन रजा यांनी महबूबा मुफ्ती यांच्या वक्तव्यावर टीका करतानाच ‘मुफ्तींनी पाकिस्तानात निघून जावं’ असा सल्लाही दिलाय.

तर राज्यसभा खासदार राकेश सिन्हा यांनी या मुद्यावर बोलताना, ‘आता ना अनुच्छेद ३७० परतणार ना मुफ्ती कधी सत्तेत येणार’ असं म्हणत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.

वाचा : वाचा :

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here