रांची : दरम्यान कैदेत असले तरीदेखील राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) नेते लालूप्रसाद यादव चर्चेत आहेत. आता यांचा एक फोटो सोशल मीडियावर जाहीर करण्यात आला. हा फोटो लालूंच्याच पक्षातील एका नेत्यानं फेसबुकवर पोस्ट केल्यानंतर भाजपकडून त्यावर जोरदार हल्लाबोल करण्यात आला. लालूंकडून आणि तुरुंग नियमांचं तसंच करोना नियमांचं उल्लंघन करण्यात आल्याचा आरोप भाजपनं केलाय.

बिहारचे राजद नेते यांनी नुकतीच लालू प्रसाद यादव यांची भेट घेतली. आपल्या भेटीचा एक फोटोही सय्यद अली यांनी आपल्या फेसबुक पेजवर शेअर केला. ‘लालूंना भेटून बिहार निवडणुकीतील स्थिती त्यांच्या कानावर घातली’ असंही त्यांनी या फोटोसोबत म्हटलंय. या फोटोत सय्यद अली लालूंसोबत बंगल्यातील एका मोकळ्या जागेत बसलेले दिसत आहेत. परंतु, दोघांच्याही चेहऱ्यावर मास्क नाही.

बिहारमध्ये राजदची अवस्था केविलवाणी असली तर झारखंडमध्ये मात्र त्याचंच राज्य आहे. चारा घोटाळ्यात शिक्षा भोगत असलेले लालू प्रसाद यादव यांना तुरुंग प्रशासनाकडून उपचारासाठी झारखंडची राजधानी असलेल्या रांची स्थित ‘राजेंद्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस’ अर्थात ‘रिम्स’च्या संचालकांच्या बंगल्यात ठेवण्यात आलंय. राजदचे तरुण नेते सय्यद अली केवळ लालू प्रसाद यादव यांचेच नाही तर उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांचेही जवळचे मानले जातात.

वाचा : वाचा :

‘केली बंगल्यात दीर्घकाळापासून तुरुंग नियमांचं उल्लंघन थांबण्याच नाव घेत नाही. तुरुंगाच्या नियमानुसार, कोणतीही व्यक्ती शिक्षा भोगत असलेल्या दोषीसोबत फोटो काढू शकत नाही. प्रश्न हा आहे की, जर हा फोटो मोबाईलमधून काढण्यात आला असेल तर हा मोबाईल केली बंगल्याच्या आत नेण्याची परवानगी कुणी दिली? तुरुंग नियमांत असंही म्हटलं गेलंय की शिक्षा भोगत असलेल्या कुणीही राजकीय चर्चा करू शकत नाही. तसंच दोषीला भेटताना सहाय्यक तुरुंगाधिकारी या दरम्यान उपस्थित राहतील. परंतु, या भेटीदरम्यान कोणतेही नियम पाळण्यात आलेले नाहीत’, असा आरोप भाजपचे प्रवक्ते यांनी केलाय.

‘या भेटी दरम्यान कुणाच्याही चेहऱ्यावर मास्क दिसत नाही. खरंतर लालू प्रसाद यादव यांना करोना संक्रमणापासून वाचवण्याच्या नावावर केली बंगल्यात ठेवण्यात आलंय. परंतु, वास्तवात राजदच्या निवडणूक मोहिमा केली बंगल्यातून आखल्या जात आहेत. बिहारचे नेते लालूंना निवडणुकीची माहिती देत आहेत. केली बंगला राजदचं मुख्य निवडणूक कार्यालय म्हणून काम करतंय. शिक्षा भोगत असलेले लालू प्रसाद मिळालेल्या सुविधांचा मोठ्या प्रमाणात दुरुपयोग करत आहेत’, असं म्हणतानाच, राज्य सरकारनं यावर त्वरीत कारवाई करायला हवी, अशी मागणी प्रतुल शाहदेव यांनी केलीय.

वाचा : वाचा :

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here