वाचा:
अंगावर किलोभर सोने घालून तसेच गाडीला गोल्ड प्लेटिंग करून फिरणाऱ्या सनीसह कुटुंबातील इतर चार जणांवर गृहपयोगी सामानाची मागणी करण्यासह अन्य गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सनी नाना वाघचौरे (वय ३१), आशा नाना वाघचौरे (वय ५६), नाना वाघचौरे (वय ६०), नीता गायकवाड (वय ३६) अशी गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तींची नावे आहेत.
वाचा:
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चित्रपट सृष्टीतील अनेक दिग्गज कलाकारांसोबत गोल्डमॅन सनीची ओळख असल्याचे अनेक कार्यक्रमांमधून दिसून आले आहे. अनेक मध्ये तो चर्चिला गेला आहे. गोल्ड प्लेटेड कार व मोबाइल तसेच अंगावर किलोभर सोने घालून फिरणारा अशी सनी याची ओळख आहे. गोल्डमॅन सनी वाघचौरे सह त्याच्या कुटुंबातील इतर सदस्यांनी पत्नीला मारहाण करून, शिवीगाळ करत गर्भपाताची औषधे देऊन गर्भपात केल्याचं फिर्यादीत म्हटलं आहे.
वाचा:
पीडितेच्या आई-वडिलांकडे गृहपयोगी वस्तूची मागणी वाघचौरे याने केली होती. दरम्यान, बाहेरील स्त्रियांशी शारीरिक संबंध ठेऊन पीडितेस मारहाण आणि शिवीगाळ करून धमकी दिल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. चिंचवड पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times