मुंबई: खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या बाधितांना वाजवी किमतीत मिळावे, यासाठी राज्यातील ‘ ‘ने खूप मोठा निर्णय घेतला आहे. या इंजेक्शनची दर निश्चिती करण्यात आली असून २३६० रुपयांना हे इंजेक्शन उपलब्ध होण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात एक अधिकृत औषध केंद्र निश्चित करण्यात आले आहे. दरम्यान, रुग्णांना वेळेवर आणि वाजवी किंमतीत रेमडेसिवीर इंजेक्शन मिळावे यासाठी जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त यांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. यांनी संबंधितांना पत्राद्वारे केले आहे. ( Latest Updates )

वाचा:

राज्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये रेमडेसिवीर इंजेक्शन मोफत उपलब्ध आहे. परंतु, खासगी रुग्णालयामध्ये उपचार घेणाऱ्यांना रुग्णांना हे इंजेक्शन मिळत नसल्याच्या अथवा महाग मिळत असल्याच्या तक्रारी राज्यात मोठया प्रमाणावर येत असून त्याची दखल घेऊन शासनाने त्याचे दर निश्चित करण्याचा निर्णय घेतला. त्याचवेळी खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांना निश्चित केलेल्या दरात रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध होण्याकरिता अन्न व औषध प्रशासन यांच्या मार्फत प्रत्येक जिल्ह्यातील खासगी औषध केंद्रेही निश्चित करण्यात आली आहे.

वाचा:

राज्यामध्ये अशी ५९ औषध केंद्र निश्चित करण्यात आली आहेत. त्यामध्ये अमरावती विभागात ५, कोकण विभागात १०, नागपूर विभागात ६, औरंगाबाद विभागात ११, नाशिक विभागात ९, बृहन्मुंबई विभागात ५ आणि पुणे विभागात १३ औषध विक्रेते निश्चित करण्यात आले आहेत. इंजेक्शनची आवश्यकता असणाऱ्या रुग्णालयाने त्याबाबत प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठविणे आवश्यक आहे. त्यासोबत प्रिस्क्रिप्शन, रुग्णाचा करोना पॉझिटिव्ह रिपोर्ट, किंवा छायाचित्र असलेले परवाना अथवा प्रमाणपत्र तसेच रुग्णाची वैद्यकीय माहिती कळविणे आवश्यक आहे.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here