नवी दिल्लीः भारतीय जनता पक्षाला () २० जानेवारी रोजी नवा मिळणार आहे. आताचे कार्यकारी अध्यक्ष हेच नवे अध्यक्ष होतील, असा कयास आहे. पक्षाध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी २० जानेवारीला नामांकन प्रक्रिया सुरू करण्यात येईल, असे पक्षाकडून सांगण्यात आले आहे.

नवे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून जेपी नड्डा यांचे नाव जवळपास निश्चित मानले जात आहे. आवश्यकता भासल्यास २१ जानेवारी रोजी निवडणूक घेतली जाईल, अशी माहिती मिळाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जेपी नड्डा बिनविरोध निवडून येतील.

जून २०१९ मध्ये नड्डा यांची कार्यकारी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. यांना केंद्रात मंत्रिपद दिल्यामुळे त्यांच्यावरील भार कमी व्हावा, यासाठी नड्डा यांना कार्यकारी अध्यक्षपद देण्यात आले होते. नड्डा पक्षाध्यक्ष झाल्यास, ते पक्षाचे ११ राष्ट्रीय अध्यक्ष असतील.

नड्डा यांनी आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेपासून () केली. १९९३ मध्ये ते हिमाचल प्रदेशमधून प्रथम आमदार म्हणून निवडून आले. त्यांनी राज्यात तसेच केंद्रात मंत्री म्हणून कार्यभार सांभाळला आहे. ५८ वर्षीय नड्डा यांच्याकडे लोकसभा निवडणुकीदरम्यान उत्तर प्रदेशची जबाबदारी सोपवण्यात आली होती. उत्तर प्रदेशमध्ये सप-बसपची आघाडी होऊनही लोकसभा निवडणुकीत भाजपला ८० पैकी ६२ जागांवर विजय मिळाला होता. तीनवेळा आमदार म्हणून निवडून आलेले नड्डा हिमाचल प्रदेशचे प्रतिनिधित्व करतात.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here