नाशिक: ज्येष्ठ नेते, माजी मंत्री, लेखक, साहित्यिक यांचे शुक्रवारी रात्री निधन झाले. ते ७७ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर मुंबईत करोनावर उपचार सुरू होते. त्यातून बरे होऊन ते नुकतेच नाशिकला घरी परतले होते. अचानक प्रकृती ढासळून त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यांचे मार्गदर्शन लाभलेला एक नेता काळाच्या पडद्याआड गेला आहे. ( Former Minister passes away )

वाचा:

विनायकदादा पाटील यांचा प्रवास थक्क करणारा होता. १९ ऑगस्ट १९४३ रोजी निफाड तालुक्यात शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. कुंदेवाडीचे सरपंच म्हणून त्यांनी राजकारणात श्रीगणेशा केला. त्यानंतर निफाड तालुका पंचायत समिती सभापती, निफाडचे आमदार, विधान परिषद सदस्य अशी भरारी घेत त्यांनी राज्य मंत्रिमंडळात उद्योग, सांस्कृतिक कार्य, क्रीडा व युवकसेवा अशा विविध खात्यांच्या मंत्रिपदाची धुरा यशस्वीपणे सांभाळली. सहकार क्षेत्रातही त्यांचा दबदबा राहिला. कुंदेवाडी विकास कार्यकारी सहकारी सोसायटीचे चेअरमन, नाशिक जिल्हा सहकारी भूविकास बँकेचे अध्यक्ष, निफाड सहकारी साखर कारखान्याचे संचालक, नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक म्हणूनही त्यांनी काम पाहिले. राज्यमंत्रिपदाच्या दर्जासह त्यांना महाराष्ट्र राज्य वनविकास महामंडळाचे अध्यक्षपदही पाच वर्षे देण्यात आले होते. त्यांना महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले होते.

वाचा:

हा त्यांचा आवडीचा आणि अभ्यासाचा विषय होता. भारतातील सहकारी वनशेतीचे ते जनक ठरले. ज्या वनस्पतीच्या तेलापासून डिझेल या इंधनाची निर्मिती होऊ शकते त्या जेट्रोफा या वनस्पतीची मोठ्या प्रमाणावर तंत्रशुद्ध शेती त्यांनी १९८६ मध्ये केली होती. या वनस्पतीपासून प्रायोगिक तत्वावर डिझेल निर्मिती करून त्यांनी तेव्हा जगाचे लक्ष वेधून घेतले होते. जेट्रोफांची लागवड आता सरकारमार्फत सर्वत्र करण्यात येत आहे. तसेच जगातील अनेक देशांत ही लागवड केली जात आहे.

विनायकदादा पाटील यांना वनशेतीतील योगदानासाठी महाराष्ट्र शासनाचा कृषीभूषण आणि वनश्री तर भारत सरकारचा इंदिरा प्रियदर्शनी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. फुड अँड अॅग्रीकल्चरल ऑर्गनायझेशन ऑफ युनायटेड नेशन्सचा आऊटस्टँडिंग ट्री फार्मर ऑफ इंडिया तसेच जीनिव्हा येथील रोलेक्स अवॉर्डही त्यांनी पटकावला होता. हे पुरस्कार मिळवणारे ते पहिले व एकमेव भारतीय होते. प्रतिष्ठेचा जमनालाल बजाज पुरस्कारही त्यांना मिळाला होता. यशोधन, निलगिरीची शेती, एक्केचाळीस वृक्ष, ऑइल ग्लूम टू ऑइल ब्लूम, जेट्रोफा २००३ ही त्यांची पुस्तके प्रकाशित आहेत. त्यांच्या ‘गेले लिहायचे राहून’ या पुस्तकाला प्रौढ वाङ्मय- ललित गद्य विभागासाठीचा राज्य शासनाचा अनंत काणेकर पुरस्कारही देण्यात आला होता.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here