मुंबई: ‘ यांच्या प्रवेशामुळं राष्ट्रवादी काँग्रेसमधील कोणत्याही मंत्र्याचं पद जाणार नाही. मंत्रिमंडळात कोणताही बदल होणार नाही. जे जिथे काम करत आहेत, ते तिथेच राहतील,’ असं ठाम प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष यांनी आज केलं.

भाजपचे बंडखोर नेते एकनाथ खडसे यांनी आज पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. खडसे हे राष्ट्रवादीमध्ये येणार हे निश्चित होताच त्यांना मंत्रिपद मिळणार असल्याची चर्चा सुरू झाली. त्यांच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमधील एका मंत्र्याला पद सोडावं लागणार, अशी चर्चा होती. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड व कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील यांची नावे घेतली जात होती. शरद पवार यांनी आज बोलताना या सगळ्या गोष्टींवर खुलासा केला. ते म्हणाले, ‘पक्ष प्रवेशाच्या आधी खडसे यांची पक्षातील अनेक नेत्यांसोबत चर्चा झाली. त्यानंतर माझ्याशीही चर्चा झाली. यातील कुठल्याही चर्चेत त्यांनी एका शब्दानेही कशाचीही अपेक्षा केली नाही. माध्यमांनी मात्र अनेक प्रकारच्या बातम्या दिल्या. त्याला काहीही अर्थ नाही. ‘जे जिथे काम करत आहेत, तिथेच राहतील,’ असं सांगत, मंत्रिमंडळात कुठलाही बदल होणार नाहीत, असं पवारांनी अप्रत्यक्षपणे सांगितलं. पवारांच्या या वक्तव्यामुळं खडसे यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेमकं काय मिळणार, याबद्दलची उत्सुकता वाढली आहे.

अजित पवार नाराज नाहीत!

खडसेंच्या पक्ष प्रवेशाला अजित पवार उपस्थित नसल्यानं ते नाराज असल्याचीही चर्चा होती. शरद पवारांनी त्याचेही खंडन केले. ‘मीडियामध्ये लोक परस्पर काहीतरी जाहीर करून टाकतात. मला आश्चर्य वाटतं. करोनाच्या काळात आमच्यातील अनेकांना त्रास झाला. त्यामुळं खबरदारी घेण्याच्या सूचना आम्ही सर्वांना दिल्या आहेत. त्यातून एखादा सहकारी इथे नसेल तर गडबड आहे असा अर्थ काढणं चुकीचं आहे,’ असंही पवार म्हणाले.

प्रवेश सोहळ्यात काय म्हणाले शरद पवार?

>> आजचा दिवस अतिशय आनंदाचा आहे

>> इतिहासाचा पहिला टप्पा संपला आहे, आता दुसरा टप्पा सुरू झाला आहे.

>> खान्देश हा मूळचा काँग्रेसच्या विचारांचा प्रदेश. मध्यंतरी तिथे उतरती कळा लागली. तिथं कार्यकर्ते घडवण्याचं काम नाथाभाऊंनी केलं. आता हा परिसर पुन्हा एकदा राष्ट्रवादीमय करू.

>> नवी पिढी मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादीमध्ये सहभागी होण्यास उत्सुक आहे. दिवसेंदिवस लोकांचं काम करण्याची शक्ती वाढतेय.

>> काही ठिकाणी पक्षाची शक्ती वाढवण्याची गरज आहे. तो विचार करताना खान्देश माझ्या नजरेसमोर येतो. धुळे, जळगाव, नंदुरबारमध्ये काम करण्याची गरज आहे

>> खान्देशात राष्ट्रवादीचं काम सुरू आहे. नाथाभाऊंच्या निर्णयामुळं या कामाला खऱ्या अर्थानं गती येईल.

>> एकदा शब्द दिल्यानंतर नाथाभाऊ मागेपुढे पाहत नाहीत. त्यामुळं नाथाभाऊ काय चीज आहे ते आम्ही दाखवून देऊ.

वाचा:वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here