जळगाव: माजी मंत्री यांनी भाजप सोडून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे. आता यांनी देखील शिवसेनेत प्रवेश करावा म्हणजे राजकारणात खऱ्या अर्थाने मजा येईल, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे उपनेते तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी आज पत्रकारांशी बोलतांना दिली.

जळगाव शहरातील अजिंठा शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी बोलताना गुलाबराव पाटील यांनी सांगितले की, शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे मुंडे परिवाराशी जिव्हाळ्याचे आणि कौटुंबिक संबंध राहिले आहेत. गोपीनाथ मुंडे आणि बाळासाहेब ठाकरे यांनी भाजप-सेनेत युती घडवून आणली होती. आता प्रीतम मुंडे लोकसभेला भाजपच्या उमेदवार असताना शिवसेनेने त्यांच्या विरोधात उमेदवार दिला नव्हता. युती असतानाही, युती नसतानाही. शिवसेनेने नेहमी कुटुंबाचे नाते जोपासले आहे. त्यामुळे आता खडसेंप्रमाणे, पंकजा मुंडे यांनी शिवसेनेत आले पाहिजे. म्हणजे राजकारणात आणखी मजा येईल, असे पाटील म्हणाले.

वाचा:

एकनाथ खडसे सुडाचे राजकारण करत असल्याची टीका होते, यावर गुलाबराव पाटील म्हणाले की, ‘याबाबत मला काहीही बोलता येणार नाही. पण सुडाचे राजकारण करायला नकोच. आयुष्य खूप छोटं आहे. त्यामुळे शक्य तेवढं शत्रुत्व घेणं टाळलं पाहिजे.’

वाचा: भाजपाच्या जाहीरनाम्यावर टीका

बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने आपला जाहीरनामा प्रकाशित केला आहे. यात भाजपची सत्ता आली तर नागरिकांना करोनाची लस मोफत देण्याचे आश्वासन दिले आहे. यावर बोलताना पाटील म्हणाले, करोनाची लस देणे हा राजकीय मुद्दा असू शकत नाही. आता करोना गेला आहे. त्यामुळे लस दिली काय, अन् नाही दिली काय? काहीएक फरक पडणार नाही. करोनाची लस दिल्यानंतरही माणूस जिवंत राहील का? याची शाश्वती नाही. त्यामुळे भाजपने करोनाची लस देण्याऐवजी बिहारमधील बेरोजगारी, वाढती गुन्हेगारी, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे झालेले नुकसान या संदर्भात बोलायला हवे.’

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here