चंदीगडः केरळ विधानसभेनंतर पंजाब विधानसभेनेही नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरुद्ध (सीएए) ठराव मंजूर केला आहे. नागरिकत्व कायदा लोकशाही विरोधी आणि भारताच्या धर्मनिरपेक्ष प्रतिमेवर आघात करणारा असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. १९३० च्या दशकात हुकुमशाह याने जे जर्मनीत केले, तेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आता भारतात करताहेत, अशी बोचरी टीका पंजाबचे मुख्यमंत्री यांनी केली आहे.

पंजाब विधानसभेत सीएए विरोधातील ठरावाच्या चर्चेदरम्यान ते बोलत होते. विभाजनकारी आहे. देशात घडणाऱ्या घटना मी जीवंत असताना घडत आहेत, हे दुर्दैवी आहे. देशाची घटना धर्मनिरपेक्षता शिकवते. मात्र, आज तुम्ही संविधानाचा पाया डळमळीत करू इच्छित आहात, असेही ते म्हणाले.

भारताच्या इतिहासापासून आपण काहीच बोध घेतलेला नाही, हेच यातून दिसते. केवळ राजकारणापाई माणसातील बंधुभाव संपुष्टात आणण्याचे काम सुरू आहे. देशात अशा प्रकारची धोरणे आखली जातील, असा आम्ही विचारही केला नव्हता, असे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी नमूद केले.

दरम्यान, केरळनंतर पंजाब हे नागरिकत्व कायदा नाकारणारे देशातील दुसरे राज्य ठरले आहे. ‘भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे’ ही ओळख अबाधित राखण्यासाठीच केंद्राचा हा कायदा आम्ही फेटाळत आहोत, असे या दोन्ही राज्यांनी नमूद केले आहे. भारताचे नागरिकत्व देताना कुणाशीही धर्माच्या आधारावर भेदभाव केला जाऊ नये. ती भारतीय राज्यघटनेची पायमल्ली ठरेल, असे या दोन्ही राज्यांचे म्हणणे आहे. या दोन राज्यांनी नागरिकत्व कायदा झुगारल्यानंतर आता अन्य राज्यांच्या भूमिकेकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here