लेखक, पत्रकार अंबरीश मिश्र यांच्या ‘चौकात उधळले मोती’ या पुस्तकाचं आज मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये प्रकाशन होणार आहे. या प्रकाशन सोहळ्यासाठी शरद पवार, सुप्रिया सुळे, राज ठाकरे व संजय राऊत यांना विशेष पाहुणे म्हणून निमंत्रण देण्यात आलं आहे. या निमित्तानं हे तिघे नेते एकत्र येण्याची चिन्हे आहेत.
वाचा:
राज्यात सध्या शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसच्या महाविकास आघाडीचे सरकार आहे. राज ठाकरे यांचा पक्ष सध्या विरोधकाच्या भूमिकेत आहे. राज यांचा पक्ष अधूनमधून सरकारच्या भूमिकांवर टीका करत असतो. अलीकडेच सुशांतसिंह राजपूत प्रकरणात राज्यातील ठाकरे सरकारबरोबरच ठाकरे कुटुंबीयांवर व्यक्तिगत आरोप करण्याचेही प्रयत्न झाले होते. त्यावेळी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ‘सामना’तून राज ठाकरे यांना साद घातली होती. ‘ठाकरे’ ब्रँडची आठवण करून दिली होती. त्यावर मनसेच्या नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या असल्या तरी राज यांनी मौन बाळगले होते. या साऱ्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे पवार व राऊत यांच्यासोबत दिसणार आहेत. यावेळी ते काय बोलतात आणि त्याला इतर दोन नेते कसा प्रतिसाद देतात, याबद्दल उत्सुकता आहे.
वाचा:
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times