वाचा:
के के रेंज विस्ताराचा प्रश्न नगर जिल्ह्यामध्ये चांगलाच ऐरणीवर आला आहे. राहुरी, नगर, पारनेर तालुक्यातील २३ गावातील जमीन अधिग्रहण होणार किंवा नाही, याबाबत संभ्रम आहे. याप्रश्नी राष्ट्रवादीचे अध्यक्ष यांनी पारनेरचे आमदार निलेश लंके यांच्यासह संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली होती. तर, खासदार सुजय विखे यांच्यासह भाजपचे पदाधिकारीही संरक्षणमंत्र्यांना भेटले होते. त्यानंतर मात्र के के रेंज विस्ताराबाबत दोन्ही पक्षांकडून विविध दावे-प्रतिदावे केले जात आहेत. त्याबाबत आज खासदार विखे यांना विचारले असता ते म्हणाले, ‘के के रेंज प्रश्ना संदर्भात मी, माजी मंत्री शिवाजी कर्डिले व भाजपचे काही पदाधिकारी संरक्षणमंत्र्यांना भेटलो. तर, संरक्षणमंत्र्यांना राष्ट्रवादीचे शरद पवार यांच्यासह काहीजण भेटले. आता हे दोन वेगळे पक्ष आहेत. दोन वेगळे प्रवाह आहेत. दोन वेगळे नेते आहेत. त्यांचे नेते पवार साहेब आहेत. आमचे नेते मोदी साहेब आहेत. पवार साहेबांवर विश्वास ठेवायचा की मोदी साहेबांवर याचा निर्णय जनतेने घ्यायचा आहे. आम्ही आमची वस्तुस्थिती मांडली आहे, त्यांनी त्यांची वस्तुस्थिती मांडली आहे. खोटे कोण, खरे कोण, या वादात मला पडायचे नाही. जनतेने कोणावर विश्वास ठेवायचा, हे जनतेने ठरवावे. सुजय विखे, कर्डिले व भाजपच्या प्रतिनिधींनी जे मत सभा घेऊन मांडले, ज्यांना त्यावर विश्वास आहे, त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवावा. कारण आता या गोष्टीवर वादविवाद करून मला यावर राजकारण करणे योग्य वाटत नाही. माझ्या रक्तात ते नाही. आमचा तो पिंड नाही. जी भूमिका तत्कालीन दौऱ्यात मांडली, त्यावर आम्ही ठाम आहोत. त्यामुळे ज्यांना मोदींवर भरवसा आहे, त्यांनी त्यांच्यावर भरवसा ठेवावा. ज्यांना शरद पवार यांच्यावर भरवसा आहे, त्यांनी त्यांच्यावर ठेवावा. भविष्यकाळात कोण खरे ठरते, हे निवडणुकीपूर्वी जनतेसमोर आल्याशिवाय राहणार नाही.’
‘राज्यातील सरकार हे षडयंत्र सरकार’
‘राज्यातील महाविकास आघाडीचे सरकारला एक वर्ष होत आले आहे. त्यांचे हे वर्ष पाहिले तर कुठल्याही प्रकारचे नियोजन नाही. फक्त पत्रकार परिषदा, प्रवेश प्रक्रिया, घोषणाबाजी, नारळ फोडणे, फोटो काढणे एवढेच या सरकारचे काम आहे. वास्तविक राज्य सरकारमुळे भ्रमनिरास झाला आहे,’ असा आरोप खासदार डॉ.सुजय विखे यांनी केला. ‘हे लोकनियुक्त सरकार नसुन षडयंत्र सरकार आहे, आणि षडयंत्रच्या सरकारकडून सर्वसामान्य माणसाला चांगले दिवस मिळतील, असे मला वाटत नाही. केंद्रात यांचे लोकनियुक्त सरकार असून तेथे जनतेला योग्य न्याय मिळत आहे. ज्यावेळी महाराष्ट्रात लोकनियुक्त सरकार येईल, त्यादिवशी खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना न्याय मिळेल,’ असेही विखे यांनी स्पष्ट केले.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times